Azadi Ka Amrit Mahotsav : राम प्रसाद बिस्मील यांनी बनविली होती काकोरी कांडाची योजना, ब्रिटिशांना देशातून हाकलण्याचे होते एकमेव लक्ष्य

क्रांतिकारी संघटनांना एकत्र आणण्यासाठी लाला हरदयाल, सोमदेव यांचे सहकारी राम प्रसाद बिस्मील यांनी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनची म्हणजे (HRA) ची स्थापना केली होती. इंग्रजांना देशातून हाकलण्यासाठी नवी योजना तयार केली होती.

Azadi Ka Amrit Mahotsav : राम प्रसाद बिस्मील यांनी बनविली होती काकोरी कांडाची योजना, ब्रिटिशांना देशातून हाकलण्याचे होते एकमेव लक्ष्य
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 4:27 PM

चौरी चोरा कांडानंतर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी अचानक असहकार आंदोलन परत घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धक्कादायक होता. राम प्रसाद बिल्मील, अशफाक उल्ला खाँ यासारख्या क्रांतिकारकांना गांधीजींच्या या निर्णयाने धक्का बसला. क्रांतिकारकांनी इंग्रजांविरोधात सशस्त्र हल्ला करण्याचा निर्धार केला. क्रांतिकारकांच्या संघटनांसाठी लाला हरदयाल (Lala Hardyal), सोमदेव यांचे सहकारी राम प्रसाद बिस्मील यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे (HRA) ची स्थापना केली. इंग्रजांना देशातून बाहेर हाकलण्यासाठी नव-नव्या योजना बनविण्यात येत होत्या. त्यापैकी एक म्हणजे काकोरी कांड ही योजना होय. स्वातंत्र्याच्या चळवळीत ही सर्वात मोठी घटना ठरली. या योजनेचे पुरस्कर्ते होते राम प्रसाद बिस्मील (Ram Prasad Bismil). ते नेहमी ब्रिटीश सत्ता देशातून निघून जावी, यासाठी प्रयत्न करत होते. फाशीच्या फंदावर चढण्यापूर्वी हे स्वप्न त्यांनी सांगितलं होतं. Tv 9 या खास वीरांना अभिवादन करते.

शहाजहानपूरमध्ये झाला होता जन्म

राम प्रसाद बिस्मील यांचा जन्म 11 जून 1897 मध्ये शहाजहानपूर येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मुरलीधर आणि आईचे नाव मूलमती होते. बिस्मील यांच्या वडिलांचं गाव बरबाई होते. ते चंबळ खोऱ्यात वसले होते. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात येत होते. राम प्रसाद यांचे आजोबा नारायण लाल यांना नोकरीनिमित्त शहाजहानपूर येथे यावं लागलं होतं.

लहानपणी अभ्यासावर जोर

राम प्रसाद बिस्मील यांच्या शिक्षणावर लहानपणीच जोर देण्यात आला होता. परंतु, त्यांचं मन अभ्यासात कमी लागत होते. उर्दू भाषेत मीडल परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यामुळं त्यांनी इंग्रजीचा अभ्यास केला. दरम्यान, त्यांची मुलाखत स्वामी सोमदेव यांच्याशी झाली. त्यांनी राम प्रसाद यांना आर्य समाजाबद्दल माहिती दिली. राम प्रसाद लहानपणी क्रांतीकारी विचारांनी प्रेरित झाले. मॅनपुरीत क्रांतीकारी घटना घडली. पंडित गेंदलाल दीक्षित यांना आग्रा येथे शस्त्र आणताना अटक झाली होती. त्यांना जेलमध्ये टाकले. ते तिथून पळाले. त्यानंतर त्यांच्या योजनेला मॅनपुरी षडयंत्र असं नाव देण्यात आलं. या कांडात शहाजहानपूरचे सहा युवक सहभागी झाले होते. त्यात राम प्रसाद बिस्मील लीडर होते.

हे सुद्धा वाचा

इंग्रजांचा खजिना लुटला

महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन परत घेतलं. इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी सशस्त्र क्रांती हा एकमेव पर्याय होता. 3 ऑक्टोबर 1924 मध्ये राम प्रसाद बिस्मील आणि अन्य क्रांतीकारकांनी मिळून हिंदुस्तान रिपब्लीक असोसिएशनची स्थापना केली. राम प्रसाद बिस्मील यांनी खजिना लुटण्याची योजना बनविली. शहाजहानपूरवरून लखनौला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला काकोरीत लुटून इंग्रजांना इशारा दिला होता. त्यात अशफाक उल्ला खाँ, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशन सिंह, चंद्रशेखर आझादसह अन्य क्रांतीकारक होते.

फाशीची शिक्षा सुनावली

26 ऑक्टोबर 1925 ला त्यांना अटक करण्यात आली. 18 महिने कोर्टात खटला चालला. त्यानंतर बनारसी याने राम प्रसाद यांच्या विरोधात साक्ष दिली. त्यामुळं राम प्रसाद यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 19 डिसेंबर 1927 ला गोरखपूर कैदेत राम प्रसाद यांना फाशी देण्यात आली. देवरिया येथे राम प्रसाद यांचे समाधीस्थळ आहे. राम प्रसाद हे एक कवी आणि लेखकही होते.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.