Bacha Bazi : लोकनियुक्त किंवा तालिबानी, सरकार कुणाचंही असो अफगाणमध्ये बच्चाबाजी जोरात, काय आहे प्रकार?

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेल्या अफगाणिस्तानमध्ये धार्मिक कायद्याच्या गप्पा मारणाऱ्या तालिबानच्या छत्रछायेखालीच एक अशी प्रथा सुरू आहे ज्यात शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचं शोषण होतं. या प्रथेचं नाव आहे 'बच्चाबाजी' किंवा 'बच्चा/बचा पार्टी'.

Bacha Bazi : लोकनियुक्त किंवा तालिबानी, सरकार कुणाचंही असो अफगाणमध्ये बच्चाबाजी जोरात, काय आहे प्रकार?
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 6:47 AM

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेल्या अफगाणिस्तानमध्ये धार्मिक कायद्याच्या गप्पा मारणाऱ्या तालिबानच्या छत्रछायेखालीच एक अशी प्रथा सुरू आहे ज्यात शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचं शोषण होतं. या प्रथेचं नाव आहे ‘बच्चाबाजी’ किंवा ‘बच्चा/बचा पार्टी’. बच्चा या फारसी शब्दाचा अर्थ मुलं असा आहे. ही मुलं मुलींसारखे कपडे घालतात आणि खासगी पार्ट्यांमध्ये नृत्य करतात.

हे इथंच थांबत नाही, तर पार्टी संपताना उपस्थित पाहुणे या मुलांसोबत एक रात्र घालवण्यासाठी बोली लावतात. या व्यवसायासाठी मुलांवर नियंत्रण असणाऱ्याला प्लेबॉय म्हणतात. हेच प्लेबॉय पाहुण्यांना मुलं पुरवण्याचं आणि त्यासाठीचे आर्थिक व्यवहार पाहतात.

अफगाणिस्तानमध्ये देहव्यापारावर बंदी, बच्चाबाजी कशी सुरू?

अफगाणिस्तानमध्ये देहव्यापारावर बंदी आहे. आधीच्या सरकारनेही यावर कायदेशीर बंदी घातली होती आणि तालिबान्यांकडून ज्या धार्मिक शरिया कायद्याच्या अंमलबजावणीचा दावा केला जातोय त्यालाही हे मान्य नाही. असं असतानाही आधीही कायदेशीर शिक्षेची तरतूद करुनही हा प्रकार चालायचा आणि आताही तालिबान्यांकडून यासाठी कठोर आणि हिंस्र शिक्षा असतानाही हे प्रकार सुरूच आहेत.

विशेष म्हणजे धार्मिक गप्पा मारणाऱ्या तालिबान्यांपैकी काही जण या प्रथेला पारंपारिक धार्मिक प्रथा असल्याचं सांगतात. सैन्यात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या मते, या प्रथेत प्रत्येकाचे स्वतःचे हितसंबंध आहेत. काहींना तर मुलींपेक्षा मुलं अधिक आवडतात. हे अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. यात 13 ते 20/25 वर्षांच्या मुलांचा वापर होतो.

“गरीब घरातील किशोरवयीन मुलं पैशांसाठी अडकतात”

आर्थिक पातळीवर दिवाळखोरीच्या स्थितीत असलेल्या अफगाणमधील अनेक किशोरवयीन मुलं पैशांसाठी यात अडकतात. अनेक मुलं तर यातून पैसे कमावून चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, भविष्यात मोठं व्हायचं आहे असंही म्हणतात. मात्र, त्यांना हा पुन्हा माघारी न येता येणारा सापळा असल्याची जाणीव फार उशिरा होते.

गरजू मुलांना मदतीचा दलालांचा दावा

या संपूर्ण रॅकेटमध्ये एक मोठी साखळी असते. छोटे मोठे दलाल गरजू मुलांचा शोध घेतात. त्यांना हेरून पैशांचं आमिष दाखवतात. यानंतर त्यांच्यावर काही लोक असतात ते या मुलांना आणखी पुढे पाठवतात. हा संपूर्ण धंदा मुलांच्या शोषणाचा असला तरी हे दलाल मात्र आपण गरजू मुलांना मदत म्हणून हे करत असल्याचा दावाही करतात.

आर्थिक अडचण असणाऱ्या मुलांचा बच्चाबाजीसाठी मोठा वापर

दुकानांबाहेर जिथं किशोरवयीन मुलं गोळा होतात अशा ठिकाणी जाऊन दलाल या मुलांशी आपली ओळख वाढवतात. त्यानंतर निमित्त काढून त्यांच्या घरात काही अडचण आहे का, त्यांना कशाची कमतरता आहे का? अशी चौकशी करतात. यात जो मुलगा आपली अडचण बोलून दाखवतो त्याला हे दलाल मदतीचं आमिष दाखवून हे काम करायला लावतात.

लग्नासाठी आर्थिक मदतीच्या आश्वासनानं पालकही तयार

मुलांचं वय 20-25 वर्षांच्या वर गेलं आणि त्यांची या व्यवसायात गरज उरली नाही की आम्ही या तरुणांना त्यांचं आयुष्य स्थिर करण्यासाठी मदत करतो. त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत करतो, असंही या व्यवसायातील दलाल दावा करतात. अफगाणमधील लोकही लग्नावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. त्यामुळे लग्नासाठी आर्थिक मदतीच्या आश्वासनानं पालकही अनेकदा मुलांना या व्यवसायात जाण्यापासून रोखत नाहीत.

मुलांना बच्चा पार्टित नाचताना दारुही पाजली जाते

सुरुवातीला हे दलाल मुलांना काम देतो म्हणून आपल्याकडे बोलावतात. त्यांना काही दिवस नाचण्याचं, मुलींची वेशभुषा आणि मेकअप अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. या सापळ्यात अडकलेल्या मुलांना याचा त्रास होत नाही का असं विचारल्यास होतो, पण पैशांची गरज जास्त महत्त्वाची असल्याचं ते कबूल करतात. या मुलांना बच्चा पार्टित नाचताना दारुही पाजली जाते. यासाठी पार्टितील पाहुण्यांकडून जबरदस्तीही होते.

अफगाणिस्तान इस्लामिक राष्ट्र असल्यानं इथं कडवट धार्मिक राष्ट्राप्रमाणे महिलांवर अनेक निर्बंध आहेत. तेथे त्यांच्या घराबाहेर पडण्यास बंदी असल्यानं त्या कोठेही इतर ठिकाणी जाऊ शकत नाही.

बच्चा पार्ट्यांच्या आयोजनात अनेक उच्चपदस्थ सहभागी

लोकनियुक्त अफगाण सरकारने या बच्चा पार्ट्यांवर बंदी घातली होती. मात्र, उच्च पदस्थ, मोठ्या हुद्द्यावर काम करणारे कमांडर यानंतरही अशा बच्चा पार्ट्यांच्या आयोजनात सहभागी असल्याचं काही सैनिकांनी सांगितलंय. कायदेशीर पातळीवर बंदी असली तरी त्याची अंमलबजावणी करणारी पोलीस यंत्रणा कसं काम करते यावरच हे अवलंबून राहतं. त्यामुळे इथं कायदेशीर बंदी असली तरी हा प्रकार सर्रास चालताना दिसतो. हे सरकारलाही माहिती आहे, मात्र कुणीही यावर बोलायला तयार होत नाही.

बच्चाबाजीच्या डीव्हीडीचं मोठं मार्केट

बच्चाबाजी / बच्चा पार्टीचे व्हिडीओ तयार करुन त्याच्या डीव्हीडी देखील विकल्या जातात. बाजारात या डीव्हीडींना मोठी मागणी आहे. अनेक मुलांच्या अशा डीव्हीडीही तयार केल्या जातात. या डीव्हीडींना मोठा ग्राहकवर्गही आहे. महिलांना घरात बंदिस्त करणाऱ्या अफगाण समाजात महिलांना पर्याय म्हणून लहान मुलांचं शोषण होतं. या मुलांनाच मुली/महिलांचे कपडे घालून नाचवलं जातं, गुलाम केलं जातं, लैंगिक शोषण होतं आणि टोक म्हणजे या मुलांच्या हत्याही होतात. काही लोक हा बच्चाबाजीचा प्रकार पाकिस्तानमधून अफगाणमध्ये आल्याचं बोलतात.

बच्चाबाजी शिवाय अनेक पुरुषप्रधान स्पर्धांचं आयोजन

अफगाणिस्तानमध्ये लहान मुलांच्या देहव्यापारासोबतच असे अनेक खेळ आहेत जे पुरुषप्रधान मुस्लीम समाजाच्या मनोरंजन आणि आनंदासाठी आयोजित केले जातात. यात घोड्यांना एका वर्तुळात आणणं, कुत्र्यांची मारामारी यांचा समावेश आहे. या सार्वजनिक स्पर्धात महिला ना सहभागी होऊ शकत, ना प्रेक्षक म्हणून हजर राहू शकत. हा केवळ पुरुष केंद्रित परंपरांचा भाग आहे.

हेही वाचा :

अफगाणी चिमुरड्याला आईप्रमाणे प्रेम करणारी अमेरिकन महिला सैनिकही स्फोटात शहीद

VIDEO: तालिबान्यांपासून सुटकेसाठी उभे, अचानक स्फोट आणि मृतदेहांचा खच, ओढ्यातील रक्ताच्या पाण्यानं हादरवलं

Kabul Airport Attack: काबुल विमानतळावर 24-36 तासात आणखी एक हल्ल्याची शक्यता, अमेरिकेच्या अध्यक्षांचा इशारा

व्हि़डीओ पाहा :

Know all about the trade and tradition of Bacha Bazi in Afghanistan form many year

Non Stop LIVE Update
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.