कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर का वाढवले ? काय फायदा होणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्यामुळे नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. (covishield vaccine second dose)

कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर का वाढवले ? काय फायदा होणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 6:31 PM

मुंबई : भारत सरकारने कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्यामुळे नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे सरकारने कोविशील्ड लसीच्या डोसमध्ये अंतर वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे ? हे समजून घेऊया. (know all details about Covishield vaccine second dose timing extension effect)

डोसमधील अंतर वाढवल्यानंतर काय होणार

भारत सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवड्यावरुन 12 से 16 आठवडे केले आहे. एखाद्या व्यक्तीला सहा आठवड्यानंतर कोविशील्ड लसीचा दुसरा डोस दिला तर त्याची इफिकेसी (Efficacy) ही 55.1 टक्क्यांपर्यंत असते. तर हाच डोस सहा आठवड्यांवरुन बारा आठवड्यावर नेला तर त्याची इफिकेसी ही तब्बल 80.3 टक्क्यांपर्यंत वाढते. म्हणजेच बारा आठवड्यानंतर जर का कोविशील्ड लसीचा डोस दिला तर त्याची परिणामकता ही तब्बल 25 टक्क्यांनी वाढते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास लसीचा डोस बारा आठवड्याच्या नंतर घेतला तर आपल्या शरीरातील सुरक्षा कवच 25 टक्क्यांनी वाढते.

अँटिबॉडीमध्ये दुपटीने वाढ

तसेच 55 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या एखाद्या क्यक्तीला 6 आठवड्यांऐवजी 12 आठवड्यानंतर दुसरा डोस दिला तर अँटीबॉडीमध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास शरीरातील कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या यंत्रणेत तब्बल दुपटीने वाढ होऊ शकते.

12 आठवड्यानंतर डोस दिला तर परिणामकता 82 टक्क्यांवर

लसीच्या डोसमधील कालावधीसंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाने माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सहा आठवड्याच्या आधी दुसरा डोस दिल्यानंतर लसीची परिणामकता 54.9 टक्के आहे. तर हाच डोस 12 किंवा त्यापेक्षा जास्त आठवड्याच्या अंतराने दिला तर त्याची परिणामकता 82.4 टक्क्यांवर पोहोचेल. हे सारे निरीक्षण नोंदवून लसीच्या डोसमधील अंतर वाढण्याची शिफारस ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेली आहे.

17 हजार लोकांवर चाचणी

कोविशील्डच्या परिणामकतेवर अभ्यास करण्यासाठी एकूण 17 हजार लोकांवर चाचणी करण्यात आली. या अभ्यासातील प्रमुख गोष्टी मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये 6 मे रोजी प्रसिद्ध केले होते. यामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवले तर लसीची परिणामकारता जास्त वाढते, असे यामध्ये सांगण्यात आले होते.

मृत्यूचा धोका कमी होतो

लसीच्या डोससंदर्भात पब्लिक हेल्थ इंग्लंड यांनीसुद्धा अभ्यास केला. त्यांनी सांगितल्यानुसार कोविशील्ड लसीचा एक डोस घेतल्यानंतर लस न घेतलेल्या माणसाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण 80 टक्क्यांनी कमी होते. दरम्यान, याच कारणांमुळे भारतात नॅशनल वर्किंग ग्रुपने दिलेल्या सल्ल्यानुसार तसेच तांत्रिक अभ्यास करुन कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : नागपुरात दिवसभरात 4965 रुग्णांची कोरोनावर मात, 1996 नवे कोरोनाबाधित, तर 70 जणांचा मृत्यू

“ना घाबरणार, ना तुटणार”, कोरोना रुग्णांच्या मदत करणाऱ्या श्रीनिवास यांच्या पोलीस चौकशीवर काँग्रेस आक्रमक

मुंबईकरांना दिलासा, दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला

(know all details about Covishield vaccine second dose timing extension effect)

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.