Special Story: तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला हवा; काय सांगते वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर सावली पडता कामा नये. त्यामुळे दरवाजाच्या अगदी समोर एखादे झाड किंवा खांब असणार नाही, याची काळजी घ्या. | vaastu tips
मुंबई: सध्याच्या युगात जवळपास प्रत्येकजण यश, किर्ती आणि पैसा यांच्या मागे धावत असतो. आता यापैकी काही लोक यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. मात्र, काहीजणांना गुणवत्ता असूनही अपेक्षित यश मिळत नाही. अनेकजण त्यासाठी नशिबाला दोष देतात. पण अनेकदा या सगळ्यात तुमच्या घराचे वास्तुशास्त्र (Vaastu Shashtra) महत्त्वाची भूमिका बजावत असते, याची कल्पनाही कोणी करु शकत नाही. (Vastu Shastra tips for home)
अनेकजण संपूर्ण घराची रचना वास्तुशास्त्रानुसार करतात. पण या सगळ्यात घराच्या मुख्य दरवाज्यावर अनेकजण लक्ष देत नाहीत. घराचा दरवाजा चुकीच्या दिशेला असल्यास तुमच्या प्रगतीत अडथळा येतो.
कसा आणला पाहिजे तुमच्या घराचा दरवाजा?
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर सावली पडता कामा नये. त्यामुळे दरवाजाच्या अगदी समोर एखादे झाड किंवा खांब असणार नाही, याची काळजी घ्या. तसेच दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या असल्यास त्यांची संख्या विषम असावी. घराच्या दरवाजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तरही महत्त्वाचे असते. समजा तुमच्या दरवाजाची उंची 10 फूट असेल तर त्याची रुंदी पाच फूट असायला हवी.
घराचे तोंड ज्या दिशेला असेल तिकडेच मुख्य दरवाजा असला पाहिजे. अन्यथा घरात सकारात्मक उर्जा येत नाही. तसेच घराच्या दरवाजाची उंची इतर सर्व खोल्यांच्या उंचीपेक्षा जास्त असावी. मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असल्यास घरात पैसा मोठ्याप्रमाणावर येतो. मुख्य दरवाजा पूर्वेला असल्यास घरात नेहमी शांतता नांदते. तर दरवाजा पश्चिम दिशेला असल्यास भाग्योदय होतो.
घरातील देवघर कुठे असावे?
ईशान्य भागाकडील या प्रभागात देवघर असावे. या भागात अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा इ. अवश्य करावी. देवघर येथे घेणे शक्य नसेल तर निदान जपजाप्य, पोथीवाचन, ध्यान इ.गोष्टींसाठी येथे यावे.
स्वयंपाकघर कुठे असावे?
घरातील आग्नेय दिशेला असणे सर्वाधिक शुभ मानले जाते. आग्नेयेमध्ये स्वयंपाकघराशिवाय लहान मुलांची झोपण्याची व्यवस्था करणे हे त्यांच्या शरीरसंपदा व बौद्धिक संपदा वाढविण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरते. तसेच शारीरिक व्यायामासाठीही हा भाग चांगला असतो.
बेडरूम कोणत्या दिशेला असावी?
हल्लीच्या काळात जोडप्यांमध्ये ताणतणावामुळे सतत वाद किंवा भांडणे होतात. यासाठी अन्य गोष्टींसोबत बेडरूमची दिशा हा घटकही कारणीभूत ठरू शकतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण नैर्ऋत्य भागात बेडरूम असावी. त्यामुळे पती-पत्नीमधील एकोपा वाढण्यास मदत होते.
(Vastu Shastra tips for home)