Maharashtra Fights Corona: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम कशी द्यायची? वाचा सोप्या टिप्स

| Updated on: May 01, 2021 | 11:34 AM

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करुन तुम्ही देखील कोरोना विरुद्धच्या लढाईत योगदान देऊ शकता. Maharashtra Chief Minister Relief Fund covid

Maharashtra Fights Corona: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम कशी द्यायची? वाचा सोप्या टिप्स
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. महाराष्ट्र सरकारनं 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाचा खर्च महाराष्ट्र सरकार राज्याच्या तिजोरीतून करणार आहे. महाराष्ट्रातील काही संस्थाकडून कोरोना संकट सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून राज्य सरकारनं कोरोनासाठी वेगळं बँक खातं उघडलं आहे. तुम्हाला देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करायची असल्यास नेमकी काय प्रक्रिया आहे हे जाणून घ्या.(Maharashtra fights corona how to donate amount for Chief Minister Relief Fund Covid fund check full details)

मुख्यमंत्री सहायता निधीला मदत कशी करायची?

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in/index ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम जमा करण्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

मदत जमा करण्याचे पर्याय

राज्य सरकारनं कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याची माहिती खालील प्रमाणं आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी:कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक: 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई: 400023
शाखा कोड: 00300
आयएफएससी कोड: SBIN0000300

क्यूआर कोड स्कॅन करुन देखील मदत

मुख्यमंत्री सहायता निधीच्या https://cmrf.maharashtra.gov.in/index वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक क्यूआर कोड पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या बँक किंवा कोणत्याही पेमेंट अ‌ॅपद्वारे क्यू आर कोड स्कॅन करुन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करु शकता. या वेबसाईटच्या मुखपृष्टावरील ऑनलाईन देणगी या पर्यायावर क्लिक करुन देखील मदतनिधी जमा करता येईल. व्यक्तिगत, संघटना, विश्वस्त संस्था, कंपन्या यापैकी एक पर्याय निवडा त्यानंर मदतनिधीचा प्रकार निवडा आणि पुढे जावा. तुमची संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं यूपीआय किंवा डेबिट कार्डद्वारे मदतनिधी जमा करा. त्यानंतर तुम्हाला पावती उपलब्ध होईल.

इतर बातम्या:

LIC मध्ये पडून आहेत का तुमचे पैसे? आता घर बसल्या असं मिळवा परत

KBC मध्ये 1 कोटींचा जॅकपॉट, स्पर्धकाच्या खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार?

(Maharashtra fights corona how to donate amount for Chief Minister Relief Fund Covid fund check full details)