ती रात्र आठवली की, आजही अंगावर काटा उभा राहतो, इतकी घाबरलेली लोकं मी कधीही पाहिली नव्हती

त्या रात्री आम्ही पाच जणांनी भयभीत होऊन चारशे किलोमीटरचा प्रवास केला, कित्येक किलोमीटर आम्हाला गाडीचं पुढं आणि पाठी सुद्धा दिसत नव्हती. सगळं बंद असल्यामुळे आम्ही घरी पोहोचतोय का ? अशी शंका मनात येत होती

ती रात्र आठवली की, आजही अंगावर काटा उभा राहतो, इतकी घाबरलेली लोकं मी कधीही पाहिली नव्हती
mumbai puneImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:56 AM

मुंबई : रविवार, सोमवार आणि मंगळवारी घरातून कामं केलं. दुपारी दीपकचा फोन आला, आपल्याला गावाला जायचं आहे. आपल्या गावाला कोण सोडायला तयार हाय, एकजण तयार झालाय. बरं एवढं म्हटलं आणि फोन ठेवला. त्यावेळी चेंबूर येथील वाशीनाक्याच्या (Chembur Vashinaka) घरातून काम करत (Work From Home) होतो. दोन दिवसात मुंबईतील (Mumbai) वातावरण टाईट झालं होतं. तीन दिवसात घरात सानिटायझरच्या दोन बाटल्या संपल्या होत्या. प्रत्येकजण मुंबईतून बाहेर जाण्यासाठी तडफडत होता. परंतु सगळं बंद असल्यामुळे डोक्याला हात लावलेली डोकी सारखी दिसायची. पोलिसांनी लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. सगळं बंद असताना आपण गावी निघालोय, आपल्याला अडवलं तर, एवढाचं विचार डोक्यात सतत कायम होता.

घाटकोपर ये…एवढाचं दीपकचा कॉल आला. घरातून बाहेर पडलो. कुणीचं दिसेना, पोलिस मारहाण करीत असल्यामुळे रिक्षा मिळेना. हातात बॅग घेऊन तासभर उभा होतो. तेवढ्यात एक रिक्षावाला त्याने डब्बल भाडं सांगितलं. चलं म्हणालो, गाडीपर्यंत जाताना, पोलिसांनी चारवेळी रिक्षा अडवली. माझ्याकडं सकाळ मीडिया ग्रुपचं आयकार्ड असल्यामुळं गाडीपर्यंत पोहोचलो. मुंबईतलं वातावरण पहिल्यांदा इतकं टाईट पाहिलं होतं. गाडीत एकाच गावातील आम्ही पाचजण होतो.

प्रत्येकजण सॅनिटाईज लावत होता, गाडीचालक अशोक कारंडे, दीपक वाघमारे, कैलास घोलप, केतन घोलप आणि मी…आपल्याला पनवेलमधून बाहेर सोडतील असा विचार डोक्यात चालू होता. प्रत्येकाने मास्क घातला होता. प्रत्येकजण घाबरला होता. पहिल्यांदा इतकी घाबरलेली लोकं मी पाहत होतो. रस्त्याला एखादं वाहनं पुढं असायचं नाहीतर सुनसान होतं. आमची गाडी काही मिनिटात पनवेलमध्ये आली, पनवेल आडवाआडवी सुरु हाय एवढी माहिती लोकांनी पसरवली होती. साधारण आम्ही १० वाजता पनवेलमध्ये होतो.

हे सुद्धा वाचा

रस्त्याला फक्त आमचीचं गाडी दिसत होती. रस्त्याला कुणीचं नाही. त्यावेळी आम्हाला पनवेलमध्ये हायवे सुरु होताना पोलिस किंवा इतर कुणी भेटलं नाही. आता पुण्यात पोलिस अडवतील अशी आमची चर्चा सुरु झाली. रस्त्याला फक्त आम्ही पाचजण आणि गाडी दिसायची. अशोक म्हणाला मी पहिल्यांदा इतकी गाडी पळवली, नाहीतर मी गाडी कधीचं पळवत नाही. पुण्यात पुन्हा एका पेट्रोलपंपावर गाडीत पेट्रोल भरलं. पुण्यात सु्ध्दा कुणीचं नव्हतं. इतकी भयान शांतता…साधारण अडीच तासाच्या आत आम्ही पुणे क्रॉस केलं. जाम भूक लागलेली पण एकही हॉटेल उघडं दिसेना.

आता आमचं सगळं लक्ष सातारा पोलिस रस्त्यात असतील का याच्याकडं लागलं. रस्त्याला कुणीचं नसल्यामुळे आम्ही सुसाट होतो. साताऱ्यात सुध्दा आम्हाला कुणीचं दिसलं नाही. आता म्हटलं आपण घरी पोहोचतोय, इतक्या फास्ट प्रवास सुरु होता. कराडला टोल नाक्याच्या इथं आम्हाला काही गाड्या अडवल्याचं दिसलं. आमच्या सुध्दा गाडीला अडवलं, गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्यानंतर मी गाडीतून उतरलो आणि त्यांच्याशी चर्चा करायला गेलो. त्यावेळी त्या पोलिसासोबत आणखी चार पोलिस होते. काहीवेळा थांबा असं सांगितलं. त्यावेळी आणखी एकजण आला, तो इतक्या जोरात खोकला की, पोलिस म्हणाला…जावा तिकडं मरा जावा…

आम्ही खुशीत निघालो, आता अर्ध्या तासात घरात एवढचं आम्हाला माहित, घरी जाताना आम्हाला उंडाळेमध्ये एकचं गाडी जाईल एवढाचं रस्ता दिसला. तिथं एटीएम सुरु असल्यामुळे आम्ही पैसे काढले. उंडाळ्यात कुणीचं दिसलं नाही. रात्री अडीच वाजता गावाच्या वेशीवर आम्ही चौघेजण थांबलो होतो. साडेपाच तासातला हा प्रवास किती भयानक होता. लोक मरणाच्या भीतीने इकडे तिकडे पळत होती. गावात गेल्यानंतर अशोक त्याच्या घरी गेला नाही. पुन्हा मुंबईला निघाला… तो आम्हाला खास सोडायला आला होता. अशोक पुण्यातून पुढे जाईपर्यंत आम्ही सगळे कॅनॉलवर शेकोटी करुन बसलो होतो. अशोक नऊ वाजता पुन्हा मुंबईत गाडी घेऊन आलाय…कोरोनाचा काळ खूप डेंजर होता. सुरुवातीला पोलिसांची इतकी दहशत होती की, व्हॉट्सअप्पचा व्हिडीओ पाहून घरातून कोणी बाहेर पडतं नव्हतं. आज या गोष्टीला तीन वर्षे पुर्ण झाली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.