Special Story | Global Warming | ग्लोबल वॉर्मिंगसाठी मानवी उपक्रमच जबाबदार : रिसर्च
नुकत्याच झालेल्या संशोधनात ग्लोबल वॉर्मिंगसाठी मानवी आणि नैसर्गिक कारणांची तुलना करण्यात आली.

मुंबई : जगात औद्योगिक क्रांतीनंतर (Industrial Revolution) जेवढ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) झाली आहे. त्याला पूर्णपणे मानवी प्रक्रिया (Human Acitvities) जबाबदार आहेत. नुकत्याच झालेल्या संशोधनात ग्लोबल वॉर्मिंगसाठी मानवी आणि नैसर्गिक कारणांची तुलना करण्यात आली. यामध्ये आलेल्या अहवालात ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पृथ्वीच्या नैसर्गिक प्रक्रिया नाहीच्या बरोबर होत्या. या संशोधनात हवामान परिवर्तनाचे भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्याला जबाबदार पूर्णपणे मनुष्य आहे (Global Warming).
याप्रकारचं हे पहिलं संशोधन आहे. एएफीनुसार, नुकतंच प्रकाशित झालेल्या संशोधनात हे माणण्यात आलं आहे की औद्योगिक काळापासून (Industrial Era) हवामान बदलासाठी (Climate Change) नैसर्गिक प्रक्रियांची भूमिका अत्यल्प प्रमाणात आहे. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग आणि त्याच्या आसपासच्या हवेचं सरासरी तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढलं. इतक्याशा बदलाने आपल्याला मोसमी बदल, जसे दुष्काळ, पूर, वादळ इत्यादी पाहायला मिळालं.
? पॅरिस करार

Paris Agreement
2015 मध्ये जगभरातील देशाने पॅरिस कराराअंतर्गत (Paris agreement) हा संकल्प केला होता की ते जागतिक तापमान वाढीला (Global Temperature) 2 डिग्री सेंटीग्रेडने कमी ठेवू आणि जर हे शक्य झालं तर याला 1.5 डिग्रीने कमी ठेवू. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका टीमने हे निश्चत करण्याचा प्रयत्न केला की मानवी प्रक्रियेने (Human Activity) वॉर्मिंगमध्ये किती योगदान दिलं आणि यामध्ये किती नैसर्गिक शक्तींची भूमिका आहे.
? 3 वेगवेगळ्या हवामान मॉडेलचा अभ्यास
ग्लोबल वॉर्मिंगच्या (Global Warming) नैसर्गिक कारणांमध्ये अनेक प्रक्रियांचं महत्त्वाचं योगदान मानलं जायचं. अनेक स्केप्टिक्सच्या नुसार, विशाल ज्वालामुखी विस्फोट (Volcanic Eruption) आणि पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या सूर्याच्या ऊर्जेच्या मात्रेतील बदलाला हे प्रमुख आहेत. संशोधकांनुसार, 3 वेगवेगळ्या हवामान मॉडेलचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये तीन प्रमुख परिस्थितींचं सिम्युलेशन केलं गेलं. एकात फक्त ऐरोसॉलमुळे तापमान प्रभावित झालं. एकात फक्त नैसर्गिक शक्तींचा परिणाम झाला आणि तिसऱ्यामध्ये ग्रीनहाऊस वायूंचा प्रबाव राहिलं.
? तापमान वाढीसाठी मानवी प्रक्रियांचं योगदान मोठं
नेचरमध्ये प्रकाशित लेखामध्ये संशोधकांनी सांगितलं की, त्यांना 0.9 ते 1.3 डिग्री सेल्सिअस जागतिक तापमान (Global Temperature) वाढीसाठी मानवी प्रक्रियांचं योगदान आहे. हे आजच्या निरिक्षणात 1.1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढीच्या जवळपास आहे. कॅनेडिअन सेंटर फॉर क्लायमेट मॉडलिंग अँड अॅनालिसेस, एनव्हायर्नमेंट अँड क्लायमेट चेंजने नाथन जिले यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्मिंग प्राथमिक स्तरावर माणसांमुळे झाली आहे (Global Warming).
? लॉकडाऊनमुळे पृथ्वीवर उष्णता कमी झाली
वर्ष 2020 मध्ये कोव्हिड-19 मुळे (Covid-19) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीवर उष्णता निर्माण करणाऱ्या उत्सर्जनात 7 टक्के घट झाली आहे. पण, प्रदूषण वाढ नाही थांबली. संयुक्त राष्ट्रानुसार (United Nations), जर जगाला 1.5 डिग्री सेल्सिअसचं लक्ष गाठायचं असेल तर 2020 च्या दशकात दरवर्षी आम्हाला उत्सर्जनात अशीत घसरण ठेवावी लागेल. पॅरिस करारानंतर हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, उत्सर्जनाला कसं कमी केलं जावं.
Special Story | जगाला हादरवणारा अणू बॉम्ब 7200 फुटांवरुन कोसळला आणि गायब झाला, 63 वर्षांनंतर अद्यापही रहस्य गुलदस्त्यातhttps://t.co/KDpIJSRhcW#TybeeIsland #NuclearBombDropped
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2021
Global Warming
संबंधित बातम्या :
Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?
Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा ‘राज’मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट