ऐतिहासिक वस्तूंची जपणूक करणारे सदाशिव पाटील, शिवकालीन इतक्या वस्तू पाहिल्यानंतर…
घराच्या प्रवेशद्वारजवळ दोन्ही बाजूला तोफ ठेवलेले आहेत. घराच्या अंगणातला परिसर वेगवेगळ्या झाडांनी फुलला आहे. हे शेखर आणि मी पाहत होतो. परिसर पाहिल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
सांगली : 2014 च्या दरम्यान आंबेडकर जयंतीचं (Ambedkar jayanti) स्टेज गाजवलं ते मामा-भाचे यांनी त्यापैकी मामा बाळासाहेब नायकवडी आणि भाचे म्हणजे सदाशिव पाटील (sadashiv patil) तेव्हापासून हा माणूस माझ्या लक्षात होता. कारण आपल्या भागात राहून सदाशिव पाटील यांनी राज्यात मोडेलिपी मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. तसेच पाटील यांच्या वागण्या-बोलण्यातून तसं स्पष्ट दिसत होतं. वारणेच्या खोऱ्यात (warna area) अजून बरंच आपल्याला पाहायला मिळेल असंही त्यावेळी एका नेत्याने भाषणात सांगितलं होतं. सदाशिव पाटील यांनी जयंतीच्या निमित्ताने उपस्थितांना उत्तम असं मार्गदर्शन सुद्धा केलं होतं.
माझा अत्यंत जवळचा मित्र शेखरचा फोन आला. बिझी आहेस का ? मी बिझी नाही परंतु पाऊस सकाळपासून बिझी असल्याचं सांगितलं. या हास्यास्पद वाक्यानंतर लवकर डॉक्टरांच्या इथं ये तुला भेटायला एक सर आले आहेत. ठीक आहे आलो. सदाशिव पाटील, शेखर पाटील आणि डॉक्टर मिलिंद पाटील बाहेरच बसले होते. माझी ओळख करून द्यायच्या आगोदर सदाशिव पाटील यांना म्हणालो. सर आता सध्या काय सुरू आहे. ते मला म्हणाले मला ओळखता. अहो सर, 2014 चं जयंतीचं स्टेज तुम्ही गाजवलेलं माझ्या लक्षात आहे. त्यावर ते हसले मी मीडियात कसा वैगेरे या विषयावर बोलू लागले. अनेक विषय बोलून झाल्यानंतर आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझ्या घरी एकदा भेट द्या. तुम्हाला अनेक जुन्या गोष्टी पाहायला मिळतील.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी निघालो होतो. त्यावेळी माझ्यासोबत अजून एकजण होता. पाटील सर वाटेत दिसले. त्यांनाही सोबत घेतलं. एका गाडीवरून तिघेजण असा आमचा वाकुर्डमार्गे प्रवास सुरु झाला. सरांचं आणि माझं अनेक विषयांवर बोलणं सुरू झालं. मुळात सदाशिव पाटील यांना एका पुस्तकाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. मला ते सांगत होते. चांगला विषय तुम्ही सुद्धा हाताळायला हवा…ठीक आहे… आमचा प्रवास संपला. पण बोलणं काही केल्या संपत नव्हतं. विषय संपवून कामाच्या ठिकाणी निघालो.
अचानक शेखर पाटील आणि मी सदाशिव यांचं कोल्हापूर जिल्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली हे गाव गाठलं. तसं हे गाव आम्हाला 2 किमी अंतरावरती आहे. पुस्तक घेऊन येऊ या हेतूने आम्ही गेलो…
घराच्या प्रवेशद्वारजवळ दोन्ही बाजूला तोफ ठेवलेले आहेत. घराच्या अंगणातला परिसर वेगवेगळ्या झाडांनी फुलला आहे. हे शेखर आणि मी पाहत होतो. परिसर पाहिल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तेवढ्यात सदाशिव पाटील सर समोर आले. आम्हाला आतमध्ये यायला सांगितलं. मी जेव्हा इथं गावात असतो त्यावेळी फक्त श्रमदान करतो असं त्यांनी मला सांगितलं. पुढे मला दोन निळ्या रंगाच्या पेट्या दिसल्या, ह्याच्यात काय ठेवलंय. त्या मधमाश्यांच्या पेट्या आहेत. जवळ जाऊ नका…मग त्यांनी दोन्ही पेट्यांमध्ये प्रत्यक्ष काय होतंय हे दाखवलं.
त्यांच्याकडे १० वेगवेगळ्या जातीचं जास्वंद आहेत. त्यापैकी त्यांनी काही जास्वंद आम्हाला दाखवली. पुढे ते म्हणाले माझ्याकडे अनेक ऐतिहासिक वस्तू आहे.त्या दिशेने आम्ही निघालो. त्यांच्याकडे अनेक प्रकारची जाती आहेत. एक जात यादव कालीन आहे. तसेच काही जाती शिवाजी महाराजांच्या काळातली आहेत. त्यामध्ये काही जाती पुरुषांची, तर काही महिलांची जाती आहेत. त्यावर आमचं बरंच बोलणं झालं.
त्यानंतर मला अननस अंगणात दिसला, हे आपल्याकडं कस काय आलं म्हणून विचारलं. तर ते आपल्याकडं येऊ शकत नाही असं तुम्हाला कोण म्हणाल ? आपल्याकडं असं कधी दिसलं नाही म्हणून विचारलं. आपण अनेक पध्दतीच्या शेती करु शकतो. पण ते आपल्या अज्ञानामुळे कधी केली असं पाटील यांनी सांगितलं. परिसरात सुपारी, नारळ, आंबा अशी अनेक पध्दतीची झाड आहेत.
घरात गेल्यानंतर पाटील सरांनी आम्हाला ब्रिटिशांच्या काळातील फिल्टर दाखवला व तो अजूनही सुरू असल्याचे आम्हाला सांगितले. त्याचबरोबर शिवकालीन काही वस्तू त्यांनी दाखवल्या. त्यामध्ये कंदील, काही जेवण करायचं साहित्य होतं. त्यानंतर आम्ही पुस्तकं पाहू लागलो. त्यापैकी दोन पुस्तकं घेऊन घरी आलो. ऐतिहासिक साहित्य जमा करणारी अशी माणसं कवचित भेटतात. त्यापैकी सदाशिव पाटील हे एक आहेत.