Water on Mars: मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे, नासाच्या संशोधनात उलगडा
नासाला प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. Water on Mars
नवी दिल्ली: अमेरिकेतील जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाला मंगळ ग्रहावरील संशोधानात मोठं यश मिळालं आहे. मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाच्या Curiosity रोवरनं महत्वाची माहिती मिळवली आहे. त्या अभ्यासानुसार मंगळ ग्रहावर पाणी उपलब्ध असल्याच पुरावे मिळाले आहेत. नासाला प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात. Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास केला गेला. ( Water on Mars revealed Nasa Curiosity Rover send data of Red Planet)
मंगळावरील दगडांच्या रचनेत बदल
नासाचा रोवर गेल क्रेटरच्या मंगळावरील Aeolis Mons या मोठ्या दगडावर फिरत आहे. तेथील मिळालेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांनी शंभर फुट धुळीनं बनलेल्या लाल ग्रह म्हणजेच मगंळावरील दगडांच्या रचनेत बदल दिसून येतात. Mount Sharp च्या तळाच्या भागात ओली माती दिसून आली आहे. त्याच्यावरील थरात वाळूची रचना आढळते.
नासाचं ट्विट
Mars mysteriously lost its atmosphere & surface water billions of years ago. As we study it with robots and one day astronauts, we may learn the cause & if there are ways to tap into the water that remains to support long-term exploration. #WorldWaterDay https://t.co/kz6uMO1S1l pic.twitter.com/Or0sDkurR5
— NASA Mars (@NASAMars) March 22, 2021
जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता
मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. ओली माती दिसून आली. त्याप्रमाण दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे. नासाच्या Curiosity रोवरला Mount Sharp ची संपर्ण माहिती घ्यायची आहे. त्यानंतरच मंगळावरील बदलणाऱ्या वातावरणाची माहिती मिळणार आहे.
वैज्ञानिक माहितीचा अभ्यास करणार
नासाचे वैज्ञानिक रोवरकडून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करणार आहेत. Curiosity रोवरनं यापूर्वी मंगळ ग्रहाचा व्हिडीओ पाठवला होता. त्यामध्ये मंगळावरील वादळांचं चित्रण होतं.
संबंधित बातम्या:
कोरोनाचं संकट वाढतंय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती तुमच्याकडं असणं गरजेचं, वाचा सविस्तर
घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर
( Water on Mars Nasa Curiosity Rover send data of Red Planet)