5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ, जाणून घ्या या जागृत देवस्थानाची माहिती
परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे.
बीड : परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे.
हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरुपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या आणि भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करुन दर्शन घेता येते.
मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ 25 कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून 60 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे.
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची आख्यायिका –
राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती. धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच दोन रत्ने होती. जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले. राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. पण, जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला. मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे. अमृतयुक्त असल्याकारणानेच याला ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ (आरोग्याचा देव) म्हणतात.
2000 वर्ष जुने मंदिर
अशी मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 18 वर्षे लागली. सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता. हे तीर्थक्षेत्र अहिल्या देवीला अत्यंत प्रिय होते असंही म्हणतात.
Shravan Somvar 2021 | अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर श्रावणातही बंदच, भाविक यंदाही भोलेनाथाच्या दर्शनापासून वंचितhttps://t.co/9izNNvq7u7#ShravanSomvar2021 #AmbernathShivMandir #Shravan2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
संबंधित बातम्या :
Shravan Month 2021 | श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी, शिवामूठ वाहण्याची पद्धत काय? जाणून घ्या