कावळा देतो अशुभ घटनांचे संकेत, या गोष्टी करताना दिसला तर लगेच व्हा सावध

शकुन शास्त्रामध्ये कावळ्याबाबत (Crow)  अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पौराणिक ग्रंथांमध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो. 

कावळा देतो अशुभ घटनांचे संकेत, या गोष्टी करताना दिसला तर लगेच व्हा सावध
कावळाImage Credit source: Social Medis
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 7:35 AM

मुंबई : हिंदू धर्माशी संबंधित पौराणिक ग्रंथांमध्ये शकुन आणि अप शकुन याविषयी सविस्तर माहिती देणयात आली आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देत असतात, अशी धार्मिक धारणा आहे. शकुन शास्त्रामध्ये कावळ्याबाबत (Crow)  अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पौराणिक ग्रंथांमध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो.  सामान्यतः असे मानले जाते की कावळा बहुतेक अशुभ घटनांचे संकेत देतो, परंतु तसे नाही. काहीवेळा कावळा शुभ संकेतही घेऊन येतो.

कावळा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसल्यास

कावळा डोक्यावर बसने हा अशुभ संकेत मानला जातो. असे मानले जाते की जर कावळा येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसला तर घरात आर्थिक अडचण निर्माण होणार आहे किंवा त्याच्या मान-सन्मानात घट होणार आहे याचा हा संकेत आहे.

छतावर बसलेले कावळे

जर कावळा येऊन घराच्या छतावर बसला आणि काव काव करू लागला तर ते शुभ लक्षण मानले जाते. हे घरी पाहुण्यांचे आगमन सूचित करते. घरात पाहुणे येणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

हे सुद्धा वाचा

पोळीचा तुकडा घेऊन उडणे

जर कावळा चोचीत पोळीचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमच्या काही मोठ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. काही चांगली बातमीही मिळू शकते.

अनेक कावळे एकत्र काव काव करत असतील तर

घराजवळ किंवा छतावर कळपात कावळे एकत्र ओरडत असतील तर ते अशुभ लक्षण मानले जाते. कुटुंबातील एखाद्या सदस्यावर मोठा धोका संभवतो.

दक्षिणेकडे तोंड करून कावळा ओरडत असेल तर

जर कावळा दक्षिणेकडे तोंड करून ओरडत असेल तर ते अशुभ मानले जाते. हे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे संकेत देते. हे कुटुंबातील सदस्याच्या गंभीर आजाराचे किंवा अपघाताचे लक्षणही मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.