आता मदरस्यांमध्ये शिकविले जाणार रामायणाचे पाठ, या कारणासाठी घेण्यात आला निर्णय

मदरशांमध्ये रामायण शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे. याआधी उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मुलांना संस्कृत शिकवण्याचीही चर्चा होती, त्याला मुस्लिम मौलानांकडून तीव्र विरोध झाला होता.

आता मदरस्यांमध्ये शिकविले जाणार रामायणाचे पाठ, या कारणासाठी घेण्यात आला निर्णय
मदरसा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 1:02 PM

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात (Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर संपूर्ण देश राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संबंधी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. याबाबत उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, वक्त बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांमध्ये आम्ही मुलांना संस्कृत शिकवू आणि मुलांना रामायणाचे धडेही शिकवू जेणेकरून मुले त्यांच्या संस्कृतीशी जोडली जातील. त्यांना त्यांच्या इतिहासाचे भान असले पाहिजे. या मुलांना संस्कृतबरोबरच वेद, पुराण, रामायणही शिकता येईल. याआधी उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मुलांना संस्कृत शिकवण्याचीही चर्चा होती, त्याला मुस्लिम मौलानांकडून तीव्र विरोध झाला होता. मात्र आता या प्रकरणात आणखी एक पाऊल पुढे टाकत मदरशांमध्ये रामायण शिकवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घोषणा केली आहे की बोर्डाच्या अंतर्गत शिकणाऱ्या 117 मदरशांमध्ये मुलांना रामायण देखील शिकवले जाईल.

रामायणासाठी नेमण्यात येणार विशेष शिक्षक

मदरशांमध्ये रामायण शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे.यापूर्वी शादाब शम्स यांनी सांगितले होते की, आतापासून मदरशांमध्येही संस्कृतचे शिक्षण दिले जाईल, तर मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ.  काझमी यांनी मदरशांमध्ये मुलांना वेदांचे ज्ञान देण्याबाबतही सांगितले होते. या विधानांना मोठा विरोध झाला असला तरी आता मंडळाकडून रामायण शिकविण्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये रामायण शिकवण्यामागे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांचा विश्वास आहे की मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. शादाब शम्स यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणही तापले आहे. या निर्णयाबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, तर मदरशांमध्ये रामायण नक्कीच शिकवले जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला विरोध होत असला तरी, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही असंही ते म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.