Aashadhi Ekadashi 2023 : उद्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे बनवा साबुदाणा खिचडी, अशी आहे सोपी रेसिपी

उपवास म्हंटलं की साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi recipe) ही आलीच. मात्र खिचडी बनवतांना ती बऱ्याचदा चिक्कट होते. यासाठी नेमकी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

Aashadhi Ekadashi 2023 : उद्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे बनवा साबुदाणा खिचडी, अशी आहे सोपी रेसिपी
साबुदाणा खिचडीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 4:26 PM

मुंबई : उद्या आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) आहे. सर्व एकादशींमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोकं घरोघरी विठूरायाची पुजा करतात. या एकादशीला उपवासाचे विशेष महत्त्व आहे. उपवास म्हंटलं की साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi recipe) ही आलीच. यंदाच्या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा खमंग साबुदाणा खिचडी बनवण्याचा बेत आखला असेल तर ही वेगळी रेसीपी नक्की ट्राय करा. उपवासाची लज्जत वाढवणाऱ्या साबुदाणा खिचडीसाठी कोणकोते साहित्य लागणार आहे. तसेच याची पाक कृती काय आहे हे जाणून घेऊया.

साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य

  • साबुदाणा – 1 वाटी (भिजवलेला)
  • बटाटा (उकडलेले)
  • हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • शेंगदाणे 1/2 वाटी
  • जिरे – 1 छोटा चमचा
  • मिरची पावडर
  • मीठ
  • तेल

पाक कृती

  • साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून किमान 4 तास पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे.
  • यानंतर, साबुदाणा खिचडी करण्यासाठी, सर्वात आधी बटाटे उकडून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा.
  • त्यानंतर तवा गरम करून त्यात शेंगदाणे टाका. शेंगदाणे तेलाशिवाय भाजायचे आहेत हे लक्षात ठेवा.
  •  शेंगदाणे हलके भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.
  • यानंतर हे दाणे मिक्सरमधुन पाच सेकंद फिरवून घ्या.
  • आता मंद आचेवर पॅन गरम करा, नंतर त्यात सुमारे दोन चमचे रिफाइंड तेल घाला.
  • तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून जिरे आणि उकडलेले बटाटे घाला.
  • आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ घालून नीट ढवळून घ्या.
  • बटाटे हलके तपकिरी रंगाचे झाल्यावर त्यात  शेंगदाणे घालून नीट ढवळून घ्या.
  • त्यानंतर त्यात साबुदाणा टाका आणि सतत ढवळत राहा. या दरम्यान गॅसची आच मंद ठेवावी.
  • साधारण 10 मिनिटांनी गॅस बंद करा. तुमची स्वादिष्ट साबुदाणा खिचडी तयार आहे.

साबुदाण्याची खिचडी बनवतांना साबुदाना भिजवतांना विशेष काळजी घ्या. गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्यास खिचडी चिक्कट किंवा लगदा होऊ शकते. या शिवाय खिचडी बनवतांना त्यात पाणी टाकू नये.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.