aashadi ekadashi 2022: रूक्मिणी मूर्तीच्या चरणावरील‌ लेपन प्रक्रिया पूर्ण

पंढरपूर, पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी (vitthal rukmini) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi 2022) निमित्याने दरवर्षी लाखों भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येतात. विठुराया आणि रुक्मिणीच्या पायावर डोकं ठेऊन दर्शन घेतात. यामुळे रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाची झीज झाली आहे. ती झीज भरून काढण्यासाठी मूर्तीच्या पायाला वज्रलेप लावण्यात आला (Rukmini mata vajralep coating). वज्रलेप लावण्याची प्रक्रिया नियुक्तीच […]

aashadi ekadashi 2022: रूक्मिणी मूर्तीच्या चरणावरील‌ लेपन प्रक्रिया पूर्ण
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 5:57 PM

पंढरपूर, पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी (vitthal rukmini) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi 2022) निमित्याने दरवर्षी लाखों भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येतात. विठुराया आणि रुक्मिणीच्या पायावर डोकं ठेऊन दर्शन घेतात. यामुळे रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाची झीज झाली आहे. ती झीज भरून काढण्यासाठी मूर्तीच्या पायाला वज्रलेप लावण्यात आला (Rukmini mata vajralep coating). वज्रलेप लावण्याची प्रक्रिया नियुक्तीच पूर्ण झाली आहे ही प्रक्रिया रात्री आणि दिवसा मिळुन पाच ते सहा तास चालली होती. सिलिकॉन पावडर आणि इतर साहित्य वापरून झीज झालेल्या ठिकाणी चरण पूर्ववत केले.

औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही लेपन‌ प्रक्रिया पार झाली. दरम्यान आज दिवसभर रूक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्श दरर्शन‌ बंद राहणार आहे. रूक्मिणी मूर्तीच्या चरणाची झीज झाली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येवून मूर्तीची पाहाणी केली होती. त्यानंतर काल रात्री मूर्तीच्या चरणावर लेपन प्रक्रियेला सुरुवात  करण्यात आली आणि आज दुपारी ती  प्रक्रिया पुर्ण झाली असल्याची. माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

वारकरी संप्रदायाचा सर्वातमोठा उत्सव आशादी एकादशी 10 जुलैला येत आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यंदाची वारी विशेष असणार आहे, कारण कोरोना काळात निर्बंधामुळे गेल्या वर्षी मंदिर भक्तांसाठी बंद होते. त्यामुळे यंदा मोठ्यासंख्येने भक्तांची पाऊलं पंढरीच्या दिशेने पडत असून भक्तांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वारीची हि परंपरा गेल्या आठशे वर्षांपासून सुरू आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.