Garuda Purana : या तीन गोष्टी नेहमी मूळापासून नष्ट करायला हव्या, अन्यथा तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो

सनातन धर्मात गरुड पुराणाला (Garuda Purana) मोठे महत्त्व देण्यात आले आहे. मान्यता आहे की, एखाद्याच्या मृत्यूनंतर हे ऐकले तर मृत्यू झालेल्या माणसाला शांतता आणि मोक्ष प्राप्त होते.

Garuda Purana : या तीन गोष्टी नेहमी मूळापासून नष्ट करायला हव्या, अन्यथा तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 3:05 PM

मुंबई : सनातन धर्मात गरुड पुराणाला (Garuda Purana) मोठे महत्त्व देण्यात आले आहे. मान्यता आहे की, एखाद्याच्या मृत्यूनंतर हे ऐकले तर मृत्यू झालेल्या माणसाला शांतता आणि मोक्ष प्राप्त होते. या कारणास्तव, मृत्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची प्रथा आहे. गरुड पुराणात, भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संभाषणातून नारायण भक्तीचा मार्ग दर्शविला गेला आहे (According To Garuda Purana Should Destroy Three Things Completely Otherwise It Will Harm You).

या व्यतिरिक्त जीवन आणि मृत्यूशी संबंधित सर्व सखोल गोष्टी त्या व्यक्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या मुळापासून नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते तुमच्यासाठी प्राणघातक ठरतील. त्याबद्दल जाणून घ्या –

कर्ज

जर आपण एखाद्याकडून कर्ज घेतले असेल, तर ते एका निश्चित कालावधीत परत करण्याचा प्रयत्न करा. हे न केल्यास नंतर त्याचे व्याज सतत वाोढत जाईल. अशा परिस्थितीत कर्जाचे ओझे केवळ आपले वैयक्तिक संबंधच खराब करणार नाहीत, तर मानसिकरित्याही तुम्हाला खूप तणाव वाटेल. कर्जाची भरपाई न करण्याच्या प्रकरणात अनेकदा वैमनस्य होते आणि अशा काही दुर्दैवी घटना घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

आजारपण

जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याने योग्य उपचार घेतले पाहिजेत आणि औषधं, पथ्य आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. तरच मुळापासून आजाराचा नाश होऊ शकतो. जर हा रोग मुळातून नष्ट केला नाही, तर तो अधिक गंभीर स्वरुपाने उदयास येतो. बर्‍याचजा एखाद्या रोगाद्वारे एखादी व्यक्ती इतर आजारांना बळी पडते. अशा परिस्थितीत पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो, तसेच शरीरालाही खूप त्रास सहन करावा लागतो. बर्‍याचदा हा आजार इतका जीवघेणा होतो की एखाद्या व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागू शकतो.

आग

असे म्हणतात की, सर्वात मोठ्या नुकसानीसाठी एक ठिणगी पुरेशी आहे. म्हणूनच, आग लागल्यास आग पूर्णपणे विझवावी. आपल्याला कुठेही ठिणगी दिसल्यास त्याला हलक्यात घेऊ नका आणि पूर्णपणे आग विझल्याची खात्री करुन घ्या. अन्यथा ते प्रचंड अग्नीचे स्वरुप घेऊ शकते. आगीत जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.

According To Garuda Purana Should Destroy Three Things Completely Otherwise It Will Harm You

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

Vastu Tips | ही पाच झाडं चुकूनही घराच्या अंगणात लावू नये, जाणून घ्या यामागील कारण काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.