रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार का करु नयेत, काय आहे कारण ?
हिंदू धर्मात जीवनापासून ते मृत्यूपर्यंतच्या संस्काराची माहीती दिलेली आहे. या हिंदूच्या धर्मग्रंथात या संदर्भात माहीती वाचायला मिळते.
हिंदू धर्मात सोळा संस्काराची एक विस्तृत यादी दिलेली आहे. हे संस्कार जन्म आणि मृत्यूपर्यंतचे आहेत. जीवनातील विविध टप्प्यात व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासासाठी हे संस्कार महत्वाचे मानले जातात. या सगळ्यात महत्वाचा संस्कार अंत्य संस्कार ( अंतिम संस्कार ) मानला जातो. हा संस्कार अर्थात मृत्यूनंतर केला जातो. याला सर्वात महत्वाचा संस्कार मानला जातो.
हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथात विशेष करुन गरुड पुराणात अंतिम संस्काराचे विशेष नियम आणि प्रक्रियांसंदर्भात सांगितले आहे. या लेखात आपण अंतिम संस्कार किंवा अंत्यसंस्कारासंदर्भात माहिती घेणार आहोत.
गरूड पुराण आणि अंत्य संस्काराचे नियम
गरुड पुराण हे हिंदू धर्मातील महत्वपूर्ण धार्मिक ग्रंथ आहे. याच मृत्यू आणि त्यानंतर होणाऱ्या कर्मकांडांबद्दल विस्ताराने वर्णन केले आहे. यात गरुड पुराणात मृत्यूनंतरचा प्रवास आणि आत्म्याचे लोक परिभ्रमणाच्या प्रक्रियेबाबत सविस्तर प्रक्रीया समजावून सांगितली आहे. गरुड पुराणाच्या मते अंतिम संस्कार एक धार्मिक अनिवार्यता आहे. यास विशिष्ट पद्धतीनेच करणे बंधनकारक आहे.
रात्रीच्या वेळी अंत्य संस्कार करणे निषिद्ध
गरुड पुराणात रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.पुराणात सुर्यास्तानंतर कोणताही अंत्य संस्कार करणे हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे. या मागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे दिलेली आहे.
आत्म्याची शांती :
गरुड पुराणाच्या मते जर अंतिम संस्कार रात्री केले गेले तर मृताच्या आत्म्याला शांती मिळत नाही. रात्रीच्या वेळी अंत्य संस्कार केल्याने आत्म्याचा प्रवास बाधित होऊ शकतो आणि त्याला शांती मिळत नाही.
स्वर्ग आणि नर्क यांचे द्वार :
सुर्यास्तानंतर अंत्य संस्कार केल्याने स्वर्गाचे दारे बंद होतात. नर्काचे द्वार उघडले जाते. अशी मान्यता आहे की सुर्यास्तानंतर अंत्य संस्कार केल्याने मृताच्या आत्म्याला नर्काच्या यातना भोगाव्या लागतात. आत्म्याला अनंत दु:ख आणि यातना होण्याची शक्यता वाढते.
पुढल्या जन्मात दोष :
गरुड पुराणानुसार जर सुर्यास्तानंतर अंत्य सस्कार केले तर पुढला जन्मात मृत व्यक्तीचे शरीर व्यंग अथवा दोष युक्त होते. अशी मान्यता आहे की पुढील जन्म त्याला व्यंगयुक्त शरीराचा मिळतो.
रात्रीच्या वेळी मृत्यू झाला तर काय करायचे ?
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर रात्री झाला तर गुरुड पुराणानूसार मृतदेहास पुढचा दिवस उगवेपर्यंत सुरक्षित ठेवावे, आणि सकाळ होतच जेव्हा सुर्य उगवेल त्यावेळी त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची प्रक्रीया सुरु करावी.त्यानंतर हिंदू धर्म संस्काराप्रमाणे सर्व धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्य संस्कार करावेत..