गरुड पुराणानुसार स्वत:चं आयुष्य संपवणाऱ्यांसोबत पुढे काय होतं?
हिंदू धर्मात एकूण 18 पुराणांचे वर्णन करण्यात आले आहे. या पुराणांपैकी एक म्हणजे गरुड पुराण. हा एक असा ग्रंथ आहे जो मानवाच्या कर्मांबद्दल आणि त्या आधारे त्याला मिळणाऱ्या चांगल्या आणि वाईट परिणामांबद्दल सांगतो. जेव्हा एखादा व्यक्ती आत्महत्या करतो तेव्हा त्याच्यासोबत पुढे काय होतं त्याबद्दलही या ग्रंथात सांगण्यात आलं आहे.

गरुड पुराण हा एक धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते किंवा पाप-पुण्य याबद्दल सर्व काही सांगितलं आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर माणसाला चांगले, वाईट कर्म याबद्दल तर समजतच पण सोबतच काय करू नये काय करावं याबद्दलही ज्ञान बरंच मिळतं. तसेच पापी किंवा अनीतिमान कृत्य करणाऱ्यांसाठी देवाने कोणती शिक्षा ठरवली आहे हे देखील सांगितलं आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूची भक्ती आणि त्यांना प्रसन्न करणाऱ्या शुभ कर्मांचाही उल्लेख आहे.
ग्रंथात प्रत्येक पापाची शिक्षा देखील…
या ग्रंथात प्रत्येक पापाची शिक्षा देखील वर्णन केली आहे. यापैकी एक आत्महत्या आहे. आत्महत्या हे महापाप मानले जाते. देवाने दिलेल्या मौल्यवान मानवी आयुष्याचे नुकसान करून आत्महत्या करणारा व्यक्ती पापी मानला जातो. अशा लोकांना अकाली मृत्यूनंतर वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. भागवताचार्य पंडित राघवेंद्र शास्त्री यांच्या मते, गरुड पुराणानुसार आत्महत्या करणाऱ्यांना नरकात कसे वागवले जाते ते जाणून घेऊया.
भयंकर वेदना सहन कराव्या लागतात
गरुड पुराणानुसार, जीवनाचे सात चक्र पूर्ण होण्यापूर्वीच आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवणाऱ्यांच्या आत्म्यांना भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. जे लोक वेळेपूर्वी मरतात, जसे की स्वत:ला जाळून घेणे, फाशी घेणे, विष घेणे, साप चावणे इत्यादी, हे सर्व लोक अकाली मृत्यूच्या श्रेणीत येतात.
आत्म्याला 84 लाख जन्म भटकावे लागतात
धार्मिक मान्यतेनुसार, मानवी शरीर सहज उपलब्ध होत नसते. मानवी शरीर मिळवण्यासाठी, आत्म्याला 84 लाख जन्म भटकावे लागतात आणि तेव्हाच देव कृपेने त्याला मानवी शरीर मिळतो. इतक्या मौल्यवान शरीराचा नाश केल्यावर, पाप्याला खूप त्रास सहन करावा लागतो. गरुड पुराणानुसार, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला 13 वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते आणि त्याला 7 नरकांपैकी सर्वात भयानक नरकात 60,000 वर्षे घालवावी लागतात.
नरकात किंवा स्वर्गातही स्थान दिले जात नाही.
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर साधारणपणे 30 किंवा 40 दिवसांच्या आत, आत्मा नवीन शरीर धारण करतो. पण आत्महत्या केलेल्या लोकांचे आत्मे अनिश्चित काळासाठी भटकत राहतात. अशा पापी आत्म्यांना नरकात किंवा स्वर्गातही स्थान दिले जात नाही. हे आत्मे या जगात आणि दुसऱ्या जगात भटकत राहतात.