नातेवाईकांना, मित्रमंडळींना चुकूनही शुभ कार्यात देऊ नका हे गिफ्ट, शास्त्रात सांगितलेत भयंकर परिणाम

आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा एखाद्या विशेष प्रसंगी, शुभ प्रसंगी एखादी भेट वस्तू देता, अशी भेट वस्तू देताना काय काळजी घ्यावी?

नातेवाईकांना, मित्रमंडळींना चुकूनही शुभ कार्यात देऊ नका हे गिफ्ट, शास्त्रात सांगितलेत भयंकर परिणाम
Wedding Gift Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 6:49 PM

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी धार्मिक आधारावर काही उपाय सुचवण्यात आले आहेत. तसेच कोणत्या गोष्टी करणं योग्य आहे? कोणत्या गोष्टी करणं अयोग्य याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा एखाद्या विशेष प्रसंगी, शुभ प्रसंगी एखादी भेट वस्तू देता, अशी भेट वस्तू देताना काय काळजी घ्यावी? कोणत्या प्रकारची भेटवस्तू देऊ नये, कोणती द्यावी याबाबत.

काही लोकांच्या मते एखाद्या शुभकार्याप्रसंगी काचेची वस्तू भेट स्वरुपात देणं हे शुभ आहे, मात्र काही जण अशा वस्तू गिफ्ट देणं हे अशुभ मानतात. तुम्ही देखील तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकांना भेट म्हणून काचेपासून तयार झालेली एखादी वस्तू दिली असेल. तेव्हा तुम्हाला देखील असा कधी प्रश्न पडला आहे का की काचेची वस्तू गिफ्ट म्हणून देणं शुभ आहे की अशुभ? जाणून घेऊयात वास्तूशास्त्र काय सांगतं.

काचेची वस्तू गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

घरात ठेवलेल्या काचेच्या वस्तू, फुलदाणी, सजावटीच्या वस्तू, विविध प्रकारच्या आकर्षक डिझायीनमधील आरसे या वस्तू सर्वांनाच आवडतात. या वस्तुंमुळे तुमच्या घराची शोभा वाढते. तुमचं घर आकर्षक दिसतं.मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्याची गोष्ट येते, तेव्हा अशा काचेच्या वस्तू गिफ्ट देणं हे शास्त्रामध्ये अशुभ मानलं जातं.

गिफ्टमध्ये काचेची वस्तू का देऊ नये कारण याला काचेचा गुणधर्म कारणीभूत आहे, जगामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्यातील प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट गुणधर्म असतो. काचेला देखील गुणधर्म आहे, तो म्हणजे खंडित होणं किंवा तुटणे. काच हातातून खाली पडली की ती लगेच फुटते. तिला तडा जातो. तसाच परिणाम संबंधित व्यक्तीवर व तुमच्या नातेसंबंधांवर देखील होतो, त्यामुळे कोणालाही गिफ्ट देताना काचेपासून बनवलेली वस्तू देऊ नये असं शास्त्र सांगतं. तसेच अशा काचेच्या वस्तू दिल्यामुळे कुटुंबात देखील भांडणे होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.