मुंबई : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी जर व्यक्ती आपल्या (Acharya Chanakya Advise) आयुष्यात लागू करेल तर ते कितीही कुठलंही ध्येय गाठू शकतात. आचार्य चाणक्य यांच्या नीतींमध्ये दूरदर्शता असते. जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा (Acharya Chanakya Advise In Chanakya Niti For Gettion Your Goal) –
1. कुठलंही ध्येय निश्चित करण्यापूर्वी स्वत:ला तीन प्रश्न विचारा.
पहिला प्रश्न – तुम्ही ते काम का करु इच्छिता?
दुसरा प्रश्न – याचा काय परिणाम होईल?
तिसरा प्रश्न – तुम्ही यात यशस्वी व्हाल?
जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खात्रीलायक वाटत असतील तर तुम्ही ते ध्येय निश्चित करु शकता.
2. तुम्ही तुचं ध्येय गाठण्यासाठी काय योजना आखली आहे याबाबत कुणालाही सांगू नका. गुप्तपणे फक्त त्या दिशेने मेहनत करा.
3. जर तुमच्या ध्येयाच्या मार्गात कुठली समस्या उद्भवली तर त्याला घाबरुन ध्येय अर्ध्यावर सोडू नका. धैर्याने समस्येचा सामना करा आणि ध्येयाप्रती सकारात्मक विचार ठेवा.
4. जे तुमच्यासोबत भुतकाळात घडलं तेच तुमच्यासोबत भविष्यातही होईल असं नसते. तुमचं भविष्य अधिक चांगलं घडवण्याची संधी नेहमी तुमच्याकडे असते. त्यामउले आपल्या भूतकाळाबाबत जास्त विचार करु नका. वर्तमान काळावर लक्ष केंद्रीत करा आणि तो चांगला करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा वर्तमान चांगला असले तर भविष्यही चांगलं होईल.
5. जर कुठली व्यक्ती कुठल्या कामात तुमची मदत करत असेल तर तो कुठल्या ना कुठल्या स्वार्थाने करतो आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे भावूक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका.
Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणारhttps://t.co/gUZDp8YKDO#ChanakyaNiti #AcharyaChanakya
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
Acharya Chanakya Advise In Chanakya Niti For Gettion Your Goal
संबंधित बातम्या :
Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले नक्की वाचा…