Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…

प्रत्येक व्यक्तीचे बरेच मित्र, नातेवाईक आणि जवळचे व्यक्ती असतात (True Friendship). ज्यांच्याशी आपले जुने नाते असते. पण फक्त त्या व्यक्तीसोबत बराच वेळ घालवल्याने आपण कोणालाही आपला खरा मित्र मानू शकत नाही.

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात...
Acharya Chanakya
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 8:47 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीचे बरेच मित्र, नातेवाईक आणि जवळचे व्यक्ती असतात (True Friendship). ज्यांच्याशी आपले जुने नाते असते. पण फक्त त्या व्यक्तीसोबत बराच वेळ घालवल्याने आपण कोणालाही आपला खरा मित्र मानू शकत नाही. खऱ्या मित्राची परीक्षा नेहमीच कठीण परिस्थितीत होते. वास्तविकता अशी आहे की बर्‍याचदा जेव्हा परिस्थिती विपरीत असते तेव्हा आपल्या आजूबाजूचा घोळकाकमी होतो (Acharya Chanakya Said In These Six Conditions True Friendship Tested In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांचंही हेच मत होतं. आचार्य चाणक्य विद्वान, दूरदर्शी आणि विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे स्वामी होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या अनुभवातून इतरांना नेहमी योग्य मार्ग दाखवला. चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी अशा सहा घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये जर एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी असेल तर समजून घ्या की तिच तुमचा खरा मित्र आणि शुभचिंतक आहे.

1. जेव्हा आपण एखाद्या भयंकर आजाराला तोंड देत असाल, तर त्यावेळी जर एखादी व्यक्ती तुमची मदत करत असेल आणि तुमच्या पाठीशी उभी असेल तर ती खरोखर तुमचा खरा मित्र आहे. कोरोना काळात खऱ्या मित्राची पारख सहज होऊ शकते.

2. जेव्हा-जेव्हा दुष्काळ पडतो किंवा तुमच्या घरात अशी परिस्थिती असते की कुटुंबातील सदस्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असतात, तेव्हा जो तुम्हाला मदत करतो तो खरोखर तुमचा मित्र असतो.

3. आनंद साजरा करायला अनेक येतात, परंतु दु:खाच्या वेळी केवळ तेच तुमच्या सोबत असतील ज्यांना खरंच तुमची काळजी असेल. अशा परिस्थितीत जेव्हा आपण खूप दु:खी असाल तेव्हा जो कोणी तुम्हाला पाठिंबा देतो तो तुमचा खरा मित्र असतो.

4. जेव्हा तुम्ही शत्रूंनी वेढलेले असाल आणि जर कोणी तुम्हाला कठीण परिस्थितीत मदत करत असेल तर तो तुमचा खरा मित्र आहे.

5. जीवनात बर्‍याच वेळा अशा काही परिस्थिती उद्भवतात, ज्या तुम्हाला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेऊन ठेवतात. अशा परिस्थितीत, जी व्यक्ती तुमच्याबरोबर असतो, तुम्हाला मदत करतो, तो तुमच्यासाठी खरा मित्र आहे.

6. आपल्या जवळच्या कोणाचा मृत्यू झाल्यानंतर जो तुमच्यासोबत असेल तोच तुमचा खरा मित्र आणि शुभचिंतक असेल.

Acharya Chanakya Said In These Six Conditions True Friendship Tested In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या चार व्यक्ती असतात पितृतुल्य, कधीही दुखवू नका, जाणून घ्या चौघांबद्दल

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.