Chanakya Niti | स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात

इतिहासकारांच्या मते, आचार्य चाणक्य यांचा (Acharya Chanakya) जीवनकाळ 376 इ.स.पूर्व ते 283 इ.स.पूर्वपर्यंत आहे. ते मौर्य घराण्याचे सम्राट चंद्रगुप्त मौर्यचे महामंत्री होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावाने देखील ओळखले जात होते.

Chanakya Niti | स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात
Acharya Chanakya
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 2:24 PM

मुंबई : इतिहासकारांच्या मते, आचार्य चाणक्य यांचा (Acharya Chanakya) जीवनकाळ 376 इ.स.पूर्व ते 283 इ.स.पूर्वपर्यंत आहे. ते मौर्य घराण्याचे सम्राट चंद्रगुप्त मौर्यचे महामंत्री होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावाने देखील ओळखले जात होते. त्यांनी अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथाची रचना केली. नावावरुन असे दिसते की हे पुस्तक अर्थशास्त्राबद्दल असेल, परंतु ते अर्थ यासोबतच राजकारण, मुत्सद्दीपणा समाज, जीवन आणि माणसाच्या वर्तनाबद्दलही आहे. चाणक्य हे तक्षशिला विद्यापीठात आचार्य होते. त्यांनी भिल आणि किरात समाजातील राजकुमारांना प्रशिक्षण देण्याचेही त्यांनी काम केले (Acharya Chanakya Said Women Are More Intelligent And Courageous Than Men In Chanakya Niti).

चाणक्या यांच्या जीवनावर फार कमी लिहिलं गेले आहे. त्यांच्या पुस्तकाच्या व्याख्येपासून ते त्यांनी सांगितलेले सिद्धांत, विचार आणि मुत्सद्देगिरीचे विश्लेषण इतिहासकार आणि विचारवंतांनी केले आहे.

चाणक्य यांनी आपल्या पुस्तकात स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे ते आज आपण जाणून घेऊ. त्याने चार गोष्टींमध्ये स्त्रियां पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वर्णन केले आहे. ते एका श्लोकात लिहितात –

स्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोष्टगुण उच्यते।

आहार

जेव्हा आचार्य चाणक्य लिहितात – ‘स्त्रीणां दि्वगुण आहारो’, तेव्हा याचा अर्थ असा आहे की स्त्रियांच्या आहाराची भूक पुरुषांपेक्षा जास्त असते. यासाठी कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी असा अनुमान लावता येऊ शकतो की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आणि सतत काम करतात म्हणून त्यांना अधिक अन्नाची आवश्यकता असते. ऐतिहासिकदृष्ट्या पुरुष भारी काम, युद्ध करमे किंवा नांगरणे अशा जड कामात गुंतलेले असतात. परंतु स्त्रियांच्या श्रमाचे तास आणि सातत्य पुरुषांच्या तुलवनेत जास्त असते. कदाचित म्हणूनच चाणक्या यांनी लिहिले असावे की आहार घेण्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत.

बुद्धी

आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमत्तेच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात. त्या अधिक हुशार आणि समझदार असतात. जरी देश चालवण्यासारख्या मोठ्या गोष्टी स्त्रियांकडे आल्या नाहीत, परंतु कुटुंब चालवणे देखील सोपे काम नाही. त्यासाठी सर्वात जास्त धैर्य, विवेकबुद्धी, समझदारी आणि बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. इतिहास साक्षीदार आहे की जेव्हाही त्यांनी घराबाहेरच्या जगाची जबाबदारी सांभाळावी लागली तेव्हाही त्या पुरुषांपेक्षा श्रेष्ठ ठरल्या.

धैर्य

चाणक्य लिहितात की पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धैर्यवान असतात. तथापि, हे ऐकून पुरुषांच्या भुवया उंचावतील. कारण त्यांना असे वाटते की लज्जा हे स्त्रीचे दागिने आहे आणि धैर्य पुरुषांचे आहे. पण ही गोष्ट पूर्वग्रहांनी ग्रस्त आहे. सत्य हे आहे की कोणत्याही संकटाच्या वेळी महिला अधिक धैर्यवान असल्याचे सिद्ध होते. पुरुष स्वत:ला बाहेरून शूर दाखवतात, पण ते आतून खूप कमजोर असतात.

लैंगिकता

या श्लोकाच्या शेवटी, चाणक्य लिहितात, ‘कामोष्टगुण उच्यते’, म्हणजे लैंगिकतेच्या बाबतीतही स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात. त्यांच्याकडे लैंगिक इच्छा आणि क्षमता या दोन्ही पुरुषांपेक्षा जास्त असते. ऐतिहासिकदृष्ट्या स्त्रियांच्या कामेच्छा नियंत्रित करण्यात आल्या आणि दडपल्या गेल्याने त्या स्वत:ला उघडपणे व्यक्त करु शकत नाहीत. पण सत्य हे आहे की निसर्गाने त्यांना तसे बनवलं नाही. प्रकृतीने त्यांना अधिक धैर्य आणि बुद्धिमत्तेसह अधिक लैंगिक इच्छा दिली आहे.

Acharya Chanakya Said Women Are More Intelligent And Courageous Than Men In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | फक्त श्रीमंताकडे असतात या गोष्टी, गरीबांकडे नाही, वाचा आचार्य चाणक्य यांचे विचार…

Chanakya Niti | एकपेक्षा अधिक शत्रू असल्यासं कसं लढावं?आचार्य चाणक्य काय सांगतात…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.