Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात

आचार्य चाणक् (Acharya Chanakya ) यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये हे पाच विशेष गुण आहेत तोच सुख आणि दु:खाच्या सामान्य अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो.

Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात
Acharya Chanakya
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 7:12 AM

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की जीवनात सुख-दुःख दोघांचेही अस्तित्व आहे (Acharya Chanakya). प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही परिस्थितींना वेळोवेळी सामोरे जावे लागते. परंतु हे माहित असूनही, लोक या परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवत नाहीत. सुखाच्या क्षणी जितके ते आनंदी असतात तितकेच दुःखावेळी दु: खी असतात. परंतु, दोन्ही परिस्थितींमध्ये आपण सामान्य स्थितीत जीवन जगले पाहिजे, फार आनंदी किंवा दु: खी होऊ नये, कारण आनंद किंवा दु:ख दोन्ही कायमस्वरुपी नसतात (Acharya Chanakya Says People With These 5 Qualities Can Fight The Worst Situation Easily).

आचार्य चाणक् (Acharya Chanakya ) यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये हे पाच विशेष गुण आहेत तोच सुख आणि दु:खाच्या सामान्य अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. चाणक्य नीतिमध्ये या पाच गुणांचा उल्लेखही त्यांनी केला आहे. या गुणांनी समृद्ध असलेल्या व्यक्तीवर कितीही संकटांचे डोंगर कोसळले तरी हे लोक त्याचा सामना करण्यास सक्षम असतात. असे व्यक्ती दु:खातही मन स्थिर ठेवतात.

ते पाच गुण कोणते?

धैर्य –

ज्या व्यक्तीकडे धैर्य असते ती कुठल्याही परिस्थितीवर, समस्येवर मात करते. कारण तिला माहित आहे की काहीही कायमस्वरुपी नाही. आज जर दु:ख असेल तर नक्कीच ते कधी ना कधी तरी जाईल आणि सुख येईल. म्हणूनच तो सतत वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न करत राहतो.

धन –

आपल्याला लहानपणीपासून घरात बचत करण्याची शिक्षा दिली जाते. आचार्य यांच्यामते, प्रत्येक व्यक्तीने जीवनात बचत केली पाहिजे. हे पैसे त्याच्या दु:खाच्या वेळी उपयुक्त ठरतात. ज्या व्यक्तीला बचत करण्याची सवय आहे, तो शांत राहून वाईट परिस्थितीचा सामना करतो.

निर्णय क्षमता –

प्रत्येकामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते. बुद्धीमान व्यक्ती पूर्ण विचार करुन निर्णय घेतो, घाईघाईत नाही. बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या योग्य निर्णयामुळे त्याची संपूर्ण परिस्थिती बदलून जाते.

आत्मविश्वास असणे –

जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा इतर लोक तुमची साथ सोडून निघून जातात. अशा परिस्थितीत बड्याबड्यांचाही आत्मविश्वास ढासळतो. परंतु जी व्यक्ती स्वतःच्या क्षमतेवर आणि परिश्रमांवर विश्वास ठेवून स्वत:वर आत्मविश्वास ठेवतो, सर्वात मोठे दु:खदेखील त्याला हानी पोहोचवू शकत नाही.

ज्ञान –

ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला वाईट काळातही लढा देण्यास सामर्थ्य देते. वाईट काळातही ज्यांना दररोज काही ना काही माहिती देणारी पुस्तके वाचण्याची सवय असते ती व्यक्ती स्वत:ला प्रेरित ठेवते आणि सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरही तिचे मनोबल मोडू देत नाही. असे लोक एक दिवस नक्कीच यशस्वी होतात.

Acharya Chanakya Says People With These 5 Qualities Can Fight The Worst Situation Easily

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Chanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.