Chanakya Niti | आनंदी जीवन हवंय? तर ‘या’ चार गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत..
आचार्य चाणक्य यांच्या नीति आज संपूर्ण जगात प्रचलित आहेत (Chanakya Niti). त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या आयुष्यासाठी अत्यंत फायद्याच्या असतात.
मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीति आज संपूर्ण जगात प्रचलित आहेत (Chanakya Niti). त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या आयुष्यासाठी अत्यंत फायद्याच्या असतात. पण, आपण त्यांच्या गोष्टींकडे नेहमी दुर्लक्ष करतो आणि आयुष्यात अनेकदा तोंडावर पडतो. अनेकांना असं वाटतं की आचार्य चाणक्य यांनी फक्त बोलायसाठी हे सर्व सांगितलं. पण, असं नाहीये (Acharya Chanakya Tell The Important Things In Life Which Help You To Live Happy Life In Chanakya Niti).
त्यांनी जीवनातील अत्यंत गूढ गोष्टी त्यांच्या नीति शास्त्रात सांगितल्या आहेत. त्या अमूल्य गोष्टी आपल्या आयुष्यात आत्मसात करव्या. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही आपल्या जीवनात नेहमी आनंदात राहाल.
यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवा:। न च विद्याSSगम: कश्चित् तं देशं परिवर्जयेत्।।
या श्लोकाच्या अर्थ असा की, ज्या देशात मान-सन्मान, उपजीविका, गुरु, माता-पिता, विद्या प्राप्तीसाठी कुठलंही साधन उपलब्ध नसेल. तर त्या देशातील त्या स्थानाचा लवकरात लवकर त्याग करावा.
मान-सम्मान
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला मान-सन्मानाची गरज असते. त्याशिवाय, ती व्यक्ती आपलं आयुष्य जगू शकत नाही. उदाहरणार्थ जर एखादा भिकारी भीक मागण्यासाठी आपल्या घराच्या दाराजवळ आला आणि आपण त्याचा तिरस्कार करुन त्याचा अपमान करुन त्याला पैसे दिले तर तो कधीही ते स्वीकारणार नाही. तर ज्याने ते पैसे कमावले आहेत त्याला मान-सन्मानाची गरज कशी नसेल? खरं तर, एखादी व्यक्ती संपत्तीशिवाय जगू शकते पण सन्मानाशिवाय नाही.
व्यवसाय
व्यवसाय किंवा रोजगार. रोजगाराशिवाय एखाद्याच्या जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. तो रोजगाराशिवाय जगू शकत नाही. आयुष्य जगण्यासाठी त्याला रोजगाराची गरज आहे. जर पैसे मिळाले तर तो आपली उपजीविका चांगल्या प्रकारे चालवू शकतो. रोजगार किंवा कोणत्याही निवारा मदतीशिवाय कोणीही जगू शकत नाही.
नातेवाईक
माणूस एक सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाजातच त्याचे निवास स्थान आहे. तो लोकांपासून दूर राहू शकत नाही. एकटे जीवन जगणे त्याला शक्य नाही. जेव्हाही आयुष्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती येते, तेव्हा प्रियजनांची सर्वात जास्त गरज असते. त्या आपत्तीच्या वेळी मित्र, नातेवाईक किंवा नातलग तुमच्यासोबत असतात, ज्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्य जगण्याचे सामर्थ्य मिळते.
विद्या
एखाद्या व्यक्तीला आपले जीवन सुधारण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. जर त्याने शिक्षण ग्रहण केले नाही तर त्याचे आयुष्य निरर्थक ठरेल आणि कोणत्याही कारणास्तव जर ते शिक्षण घेऊ शकले नाहीत तर येणाऱ्या पिढीसाठी ते अतिआवश्यक होऊन जाते. ज्ञानाशिवाय मानवी विकास अशक्य आहे.
Chanakya Niti | अशा स्वभावाच्या व्यक्तीला कुणीही हरवू शकत नाही….https://t.co/ITebgBRZtB
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
Acharya Chanakya Tell The Important Things In Life Which Help You To Live Happy Life In Chanakya Niti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti : ‘या’ 4 गोष्टींची कधीही वाटू नये लाज, आताच बदला नाही तर दूर जातील लोक
Chanakya Niti : व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत या 4 गोष्टी, लक्षात असुद्या अन्यथा…
Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही