Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ तीन गुरुमंत्र तुम्हाला लोकांचे प्रिय बनवतील
जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य चाणक्य हे विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे होते (Acharya Chanakya). ते केवळ एक चांगले अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर ते समाजशास्त्र, नागरीक शास्त्र, राज्यशास्त्र आणि मुत्सद्देगिरीचेही तज्ज्ञ होते.
मुंबई : जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य चाणक्य हे विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे होते (Acharya Chanakya). ते केवळ एक चांगले अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर ते समाजशास्त्र, नागरीक शास्त्र, राज्यशास्त्र आणि मुत्सद्देगिरीचेही तज्ज्ञ होते. आचार्य यांनी आपले अनुभव चाणक्य धोरणांद्वारे सामान्य लोकांसोबत शेअर केले आहेत. याद्वारे त्यांनी लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. आचार्य चाणक्य यांचे लोकप्रियतेबाबत काय मत आहे (Acharya Chanakya Three Guru Mantra To Make You Gain Respect In Chanakya Niti).
आचार्य चाणक्य म्हणाले की प्रत्येक व्यक्तीला जीवनात लोकप्रियतेची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाने प्रेम करावे, अशी इच्छा असते आणि समाजातील लोक त्याला आणि त्याच्या शब्दांना महत्त्व देतात. सर्व प्रयत्न करुनही यामध्ये काही लोक यशस्वी होतात, कारण यासाठी व्यक्तींमध्ये काही विशेष गुण असणे आवश्यक आहे.
1. आपण प्राप्त करु इच्छित असलेला आदर आधी इतरांना द्यायला शिका
प्रत्येकाला सन्मान मिळवण्याची इच्छा असते, परंतु तो कधीही असा विचार करत नाही की त्याला जो आदर हवा आहे, तो इतरांनाही हवा असतो. म्हणून तुम्ही जेवढा सन्मान मिळवू इच्छिता ते प्रथम इतरांना द्यायला शिका. निसर्गाचा नियम आहे, आपण येथे जे देता, ते आपल्याला मिळते.
2. नेहमी सत्य बोला
आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी कधीही खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नये. खोटं कधीही लपून राहात नाही, बर्याच वेळा काही लोक खोटे बोलून लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण खोटं कधीही टिकत नाही. आणि ज्या दिवशी सत्य प्रकट होते त्या दिवशी अशी व्यक्ती सर्व काही गमावते. म्हणून काहीही होऊन जाऊदे पण सत्याची साथ कुठल्याही परिस्थितीत सोडू नये.
3. दयाळू व्हा
प्रत्येक व्यक्तीमध्ये करुणा असणे आवश्यक आहे. कारण दयाळूपणा व्यक्तिमत्वाला आणखी चांगलं बनवते. जर तुमच्यात दया भावना असेल तरच आपण गरजू लोकांना मदत करु शकाल आणि जर तुम्ही एखाद्याला मदत केली तर तुम्हाला नक्कीच सन्मान मिळेल.
Chanakya Niti | मनुष्य जीवनात मृत्यूपेक्षाही सर्वात मोठे भय कोणते? आचार्य चाणक्य सांगतात..https://t.co/VJBPIC4Eea#ChanakyaNiti
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2021
Acharya Chanakya Three Guru Mantra To Make You Gain Respect In Chanakya Niti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 9 मंत्र नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti | ‘या’ तीन गुणांमुळे व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते