Adhikmass : अधिकमासातील पंचमी तिथी आज, या उपायांनी दूर होईल आर्थिक संकट

तिळाचे तेल वाटीत किंवा एखाद्या पात्रात घेऊन त्यात स्वःताचे प्रतिबींब पाहावे, त्यानंतर ते तेल एखाद्या गरीबाला किंवा शनि मंदिरात दान करावे. या विधीला छायादान असे म्हणतात.

Adhikmass : अधिकमासातील पंचमी तिथी आज, या उपायांनी दूर होईल आर्थिक संकट
अधिकमासImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 11:59 AM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार, या वर्षी 18 जुलै 2023, मंगळवारपासून अधिक मास सुरू होत आहे. 16 ऑगस्ट 2023, बुधवारी संपेल. अधिक महिन्यांमुळे श्रावण 59 दिवसांचा असेल. अधिकमासामध्ये पंचमी (Adhikmass Panchami) तिथीला विशेष महत्त्व आहे. आधिक महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी 22 जुलै 2023 रोजी शनिवारी येत आहे. ही तिथी शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ मिळू शकतो.

तुळशीचे खास उपाय

तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही.

पंचमी तिथीला अवश्य करावे हे काम

तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा. हा उपाय केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. यासोबतच या दिवशी धनप्राप्तीसाठी आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ करा.

हे सुद्धा वाचा

हनुमानाला रूईच्या पानांचा हार घालावा

अधिकमासातील पंचमी तिथीला रूईच्या पानांचा हार बनवून हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरातील सर्व प्रकारचे दोषही या उपायाने दूर होतात.

छायादान करा

तिळाचे तेल वाटीत किंवा एखाद्या पात्रात घेऊन त्यात स्वःताचे प्रतिबींब पाहावे, त्यानंतर ते तेल एखाद्या गरीबाला किंवा शनि मंदिरात दान करावे. या विधीला छायादान असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक व्याधी होत असतील तर त्याच्यासाठी छाया दान करणे खूप फायदेशीर आहे. अशा व्यक्तीने छायादान दान करावे.

छाया दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. शनिदेवाच्या दुःखापासून माणसाला मुक्ती मिळते. छाया दान माणसातील नकारात्मक विचार आणि घरातील वाईट गोष्टींना संपवते. सावली दान केल्याने व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा जे काही दुःख असेल ते सर्व तुमच्या सावलीसह परोपकारात जातात. व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि व्यक्तीला आरोग्य मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.