आहेर किंवा शगुन 101, 501 रुपये असा दिला जातो, वरचा एक रुपया देण्याचं कारण काय? जाणून घ्या

लग्न किंवा शुभ कार्यात शगुन देण्याची एक पारंपरिक प्रथान आहे. जुनीजाणती लोकं आहेराच्या पाकिटात 101, 501 अशी रक्कम टाकून संबंधित व्यक्तीला देतात. पण वरचा एक रुपया देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकदा पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आहेर किंवा शगुन 101, 501 रुपये असा दिला जातो, वरचा एक रुपया देण्याचं कारण काय? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 6:19 PM

लग्न कार्य असो की शुभ कार्य एखाद्या जुन्या जाणत्या व्यक्तीने पाकिट हातात टेकवलं की त्यात एक रुपयाचं नाणं नक्कीच असतं. खरं तर एक रूपया देण्याची गरज आहे का? असा प्रश्न पडतो. एखाद्या व्यक्तीने 501 रुपया दिले तर ते 500 रुपयेच गृहीत धरले जातात. मग हा वरचा एक रुपया उगाचच दिला जातो का? यामागे काही धार्मिक प्रथा किंवा काही वैज्ञानिक कारण आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू धर्मात विषम संख्येला गतीचं कारक मानलं जातं. तसेच प्रगतीच्या दृष्टीकोनातून विषम संख्येकडे पाहिलं जातं. विषम संख्येमुळे प्रगती एकाच जागी खुंटत नाही तर ती पुढे जात राहते. याच कारणामुळे शुभ कार्यात पाकिटात कायम विषम संख्येने रक्कम दिली जाते. पाकिटात 11, 21, 31, 51, 101, 501, 1001 असे दिले जातात.

अशुभ कार्यात याच्या उलट असते सम संख्येत रक्कम दिली जाते. 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 अस दान दिलं जातं. व्यक्तिचं निधन, श्राद्ध किंवा पितृपक्षात कायम सम प्रमाणात रुपयांचं दान दिलं जातं. सम संख्या ही शांती आणि पूर्णतेचं प्रतिक मानली जाते. मृतआत्म्याला शांती मिळावी असा या मागचा हेतू असतो. गणिती भाषेतही सम संख्या स्थिरता आणि विषम संख्येला गतीचं प्रमाण मानलं जातं. विषम संख्यांना भाग दिला की कायम काही ना काही उरतं आणि पुढे भाग सुरुच राहतो.

दुसरीकडे, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायचं तर संख्या आपल्या मेंदूवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकत असतात. न्यूरो-प्लेसबो यांच्या सिद्धांतानुसार, सम संख्या जीवनात स्थिरता आणतात. तर विषम संख्या सकारात्मकतेशिवाय आशा वाढवतात. उर्जेच्या सिद्धांतानुसार विचार केला तर, विषम संख्या या उर्जेच्या प्रवाहाचे प्रतिक आहे. या विषम संख्यांचा मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम होते, असं मानलं जातं. तर सम संख्या ही ऊर्जा स्थिर असल्याचं दर्शवतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.