Akshay tritiya 2023 : कोणत्या चुकांमूळे नाराज होते माता लक्ष्मी? अक्षय तृतीयेच्या आधी अवश्य करा या गोष्टी

यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी येणार आहे. असे मानले जाते की या दिवशी विशेष पूजा केल्याने केवळ आर्थिक लाभच मिळत नाही तर जीवनात येणारे संकटही दूर होतात.

Akshay tritiya 2023 : कोणत्या चुकांमूळे नाराज होते माता लक्ष्मी? अक्षय तृतीयेच्या आधी अवश्य करा या गोष्टी
अक्षय तृतीया
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 8:56 AM

मुंबई : हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. जे भक्त त्यांची खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात, त्यांना सुख-समृद्धी मिळते, तसेच संपत्तीचे भांडार सदैव भरलेले असते. ज्या घरात लक्ष्मी देवी निवास करते त्या घरात गरिबी कधीच राहत नाही. अक्षय तृतीयेची (Akshay tritiya 2023) तिथी लक्ष्मीपूजनासाठी विशेष शुभ मानली जाते. पण, असे मानले जाते की या सणापूर्वी अशा काही चुका होतात ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी येणार आहे. असे मानले जाते की या दिवशी विशेष पूजा केल्याने केवळ आर्थिक लाभच मिळत नाही तर जीवनात येणारे संकटही दूर होतात. पण, अशी काही कामे आहेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते. अक्षय्य तृतीयेच्या आधी कोणते कार्य टाळावे ते जाणून घेऊया.

या चुका अवश्य टाळा

  1. असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो. विशेषत: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराची स्वच्छता करावी. वास्तूनुसार याचेही अनेक फायदे आहेत. जिथे स्वच्छता असते तिथे नकारात्मकता नसते असे मानले जाते.
  2.  घरात लावलेल्या तुळशीच्या रोपालाही धार्मिक महत्त्व आहे. तुमची तिजोरी नेहमी भरलेली असावीत आणि कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल, तर सूर्यास्तानंतर तुळशीची पाने कधीही तोडू नयेत, झाडाला हात लावू नये. जे त्याचे पालन करत नाहीत त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.
  3. धार्मिक मान्यतांनुसार सूर्यास्तानंतर कधीही झाडू नये. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर झाडल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते. त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
  4. ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होत नाही, तेथे देवता वास करत नाही. याशिवाय ज्या घरात रोज भांडणे होतात त्या घरात देव वास करत नाहीत. अशा लोकांना नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
  5. दुस-याचे वाईट करणे, वाईट वागणे आणि कोणाचे वाईट चिंतने हे देखील माणसाच्या पतनास कारणीभूत ठरते. अशा लोकांवर देवी-देवता कधीच प्रसन्न होत नाहीत आणि त्यांचा आशीर्वादही देत नाहीत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी इतरांशी नेहमी चांगले वागा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.