Akshaya Tritiya 2021 | आज अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि इतर माहिती

आज 14 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2021) सण आहे. दिवस धार्मिक दृष्टीकोनातून फार महत्वाचा मानला जात आहे कारण अनेक युगांपासून या दिवशी अत्यंत शुभ घटना घडत आहेत.

Akshaya Tritiya 2021 | आज अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि इतर माहिती
Akshaya tritiya
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 9:20 AM

मुंबई : आज 14 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2021) सण आहे. दिवस धार्मिक दृष्टीकोनातून फार महत्वाचा मानला जात आहे कारण अनेक युगांपासून या दिवशी अत्यंत शुभ घटना घडत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूच्या नर-नारायण, हयाग्रीव आणि परशुराम यांचा अवतार झाला होता. सर्व विद्वानांचा मानतात की, आजपासून सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती, द्वापारयुगाची समाप्ती आणि कलियुगाची सुरुवात झाली होती. चार युगांची सुरुवात आणि समाप्तीमुळे ही तारीख युगादि तिथी म्हणून देखील ओळखली जाते (Akshaya Tritiya 2021 Know The Importance Of This Day Shubh Muhurat And Other Information).

मान्यता आहे की, या दिवशी केलेले दान, पुण्य आणि शुभ काम अक्षय्य असतात. म्हणून, लोक या दिवशी अनेक गोष्टी दान करतात आणि ठीकठिकाणी स्टॉल्स लावून अन्न, पाणी आणि सरबत देण्याचे शुभ कार्य करतात. याशिवाय या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते, तसेच गंगा स्नानासही विशेष महत्त्व आहे. आज जाणून घ्या उपासना करण्याचा शुभ वेळ आणि इतर महत्वाची माहिती.

अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त

? तृतीया प्रारंभ : 14 मे 2021 सकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून

? तृतीया समाप्त : 15 मे 2021 सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी

? पूजेचा शुभ मुहूर्त : पहाटे 5 वाजून 38 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत

अक्षय्य तृतीया पूजा विधी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करुन स्वच्छ कपडे घाला. एका पाटावर नारायण आणि देवी लक्ष्मी यांची प्रतिमा स्थापन करा. पंचामृत आणि गंगाजल असलेल्या पाण्याने त्यांना आंघोळ घाला. यानंतर चंदन आणि इत्र लावा. तांदूळ, दिवा, उदबत्ती इत्यादी फुले, तुळस, हळद किंवा रोली अर्पण करा. शक्य असल्यास सत्यनारायणाची कथा वाचा किंवा गीतेचा 18 वा अध्याय वाचा. भगवंताच्या मंत्राचा जप करा. नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करा आणि आपल्या चुकीबद्दल दिलगीरी व्यक्त करा.

सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता?

ज्योतिषाचार्य डॉ. अरबिंद मिश्रा यांच्या मते, अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही पंचांगविना करता येते आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु तरीही या अक्षय्य तृतीयेला आपण विशेष मुहूर्तावर सोने खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करु इच्छित असाल, तर मग जाणून घ्या सर्वात शुभ मुहूर्त –

❇️ सकाळी 7:30 ते 9:43 वाजेपर्यंत

❇️ दुपारी 12:10 ते सायंकाळी 4:39 वाजेपर्यंत

❇️ सायंकाळी 6:50 ते रात्री 9:08 वाजेपर्यंत

अक्षय्य तृतीयेला या गोष्टी दान करा

अक्षय्य तृतीया हा वसंत ऋतूचा शेवट आणि उन्हाळा ऋतूची सुरुवात मानली जाते, म्हणून या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, पंखे, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, सिरप आणि सत्तू. उष्णतेपासून मुक्त होणाऱ्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. असेही म्हटले आहे की या दिवशी जे काही दान केले जाईल, त्या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात प्राप्त होतील. म्हणून बरेच लोक या दिवशी सोने-चांदी देखील दान करतात.

अक्षय्य तृतीयेची पौराणिक कथा –

पौराणिक कथेनुसार, शाकल नगरात धर्मदास नावाचा एक वैश्य राहत होते. धर्मदास स्वभावाने अत्यंत आध्यात्मिक होते, जे देव आणि ब्राह्मणांची पूजा करायचे. एक दिवस धर्मदास यांनी अक्षय्य तृतीयेबद्दल ऐकले की ‘वैशाख शुक्लच्या तृतीया तिथीवर देवतांची केलेली पूजा आणि ब्राह्मणांना दिलेलं दान अक्षय्य असते.’

हे ऐकून वैश्य यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना अर्पण केले. घरी गेल्यानंतर त्यांनी देवी-देवतांची विधीवत उपासना केल्यावर ब्राह्मणांना अन्न, सत्तू, दही, हरभरा, गहू, गूळ, इत्यादीचं श्रद्धेने दान केलं.

धर्मदास यांची पत्नी त्यांना वारंवार मनाई करत होती, परंतु धर्मदास हे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान देत असत. काही काळानंतर धर्मदास यांचा मृत्यू झाला. काही काळानंतर त्यांनी द्वारकेच्या कुशावती शहराचा राजा म्हणून पुनर्जन्म घेतला. पौराणिक मान्यतेनुसार, धर्मदादास यांना राजयोग हा पूर्वीच्या जन्माच्या दानच्या प्रभावामुळेच मिळाला.

Akshaya Tritiya 2021 Know The Importance Of This Day Shubh Muhurat And Other Information

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला दान का करावे?, जाणून घ्या ही पौराणिक कथा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.