Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योगांची स्थिती, धन प्राप्तीसाठी करा हे तोडगे

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र या दिवशी प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नसतं. त्यामुळे या दिवशी काही वस्तू घरी आणू शकता.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योगांची स्थिती, धन प्राप्तीसाठी करा हे तोडगे
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 10:24 PM

मुंबई – हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. दिवाळी प्रमाणे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी अक्षय्य तृतीया खास असणार आहे. कारण या दिवशी सहा शुभ योगांची स्थिती निर्माण होत आहे. या दिवशी काही तोडगे केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त मिळेल. यंदा अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी साजरा केला जाईल. या दिवशी मगंळ कार्य, सोनं आणि काही वस्तू घेणं शुभ मानलं जातं. या दिवशी खरेदी करण्यासोबत दान करण्याचं महत्त्वही अधिक आहे.

अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहू्र्त

पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरु होईल. हा मुहूर्त 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांपर्यंत असेल.

अक्षय्य तृतीयेला सहा शुभ योग

  • त्रिपुष्कर योग – सकाळी 5 वाजून 49 मिनिटांपासून सकाळी 7 वाजून 49 मिनिटांपर्यंत
  • आयुष्मान योग – सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत
  • सौभाग्य योग – 9 वाजून 36 मिनिटांपासून संपूर्ण दिवसभर
  • रवि योग – रात्री 11 वाजून 24 मिनिटांपासून 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांपर्यंत
  • सर्वार्थ सिद्धी योग – रात्री 11 वाजून 24 मिनिटांपासून 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांपर्यंत
  • अमृत सिद्धी योग – रात्री 11 वाजून 24 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांपर्यंत

अक्षय्य तृतीयेला हे उपाय करा

  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान विष्णुंची पूजा करा. यामुळे अक्षय्य पुण्याची प्राप्ती होईल.
  • विवाह आणि इतर शुभ कार्यासाठी अक्षय्य तृतीय खास दिवस आहे. या दिवशी मुहूर्त न पाहता लग्न कार्य करू शकतो.
  • अक्षय्य तृतीयेला सोनं किंवा इतर वस्तू खरेदी करणं शुभ असतं. सोनं खरेदी केलं तर त्यात कित्येक पटीने वाढ होते.

सोनं खरेदी करता आलं नाही तर या वस्तू आणा

  • 11 कवड्या विकत घऱी आणा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.
  • दक्षिणमुखी शंख आणा. शंखात देवी लक्ष्मीचा वास असतो. तसेच शंख देवी लक्ष्मीचा भाऊ असल्याची मान्यता आहे.
  • एकाक्षी नारळही या दिवशी घरी आणणं शुभ मानलं जातं.
  • या दिवशी पारद शिवलिंगाची स्थापना करणं शुभ मानलं जातं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.