Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला या गोष्टी आणा घरी, पैशांची चणचण होईल दूर
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी केलेलं शुभ कार्याचं दुपटीने फळ मिळतं. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.
मुंबई : अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेल्या कामात शुभ फळ प्राप्त होतं. हिंदू धर्मशास्त्रात अक्षय तृतीया या सणाला पुण्य आणि धनदायक मानलं जातं. अक्षय्य म्हणजे या दिवशी घेतलेल्या कोणत्याही वस्तूंचा कधी क्षय होत नाही. म्हणजे घेतलेली वस्तू दुपटीने वाढते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाची जातक आतुरतेने वाट पाहात असतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबत काही वस्तुंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. सोनं, चांदी खरेदी करण्यासोबत काही वस्तू घरी आणल्या तर सकारात्मक उर्जा मिळते. यंदा अक्षय्य तृतीयेचा सण 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी आहे.
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी सुरु होईल. तृतीया तिथी समाप्ती 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी होईल. अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त सकाळी 7 वाजू 49 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 21 मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी केलेलं नामस्मराणचंही दुपटीने फळ मिळतं.
चला जाणून घेऊयात कोणत्या वस्तू घरी आणणं शुभ ठरेल
कवडी – देवी लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी कवडी जरूर विकत घ्या. यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
शंख – लक्ष्मी देवीच्या हातात असलेला दक्षिणामुखी शंख धनदायक मानला गेला आहे. इतकंच समुद्रमंथनातून प्रकट झाल्याने देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला दक्षिणमुखी घरी आणा. यामुळे घरात सकारत्मक ऊर्जेचा वास राहतो. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहते.
एकाक्षी नारळ – एकाक्षी नारळही शुभ मानला जातो. या दिवशी हा एकाक्षी नारळ घरी आणला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. एकाक्षी नारळ देवी लक्ष्मीचं रुप आहे. या दिवशी एकाक्षी नारळाची विधीवत पूजा करून स्थापना करावी. यामुळे आर्थिक संकट दूर होतं.
पारद शिवलिंग – पारद शिवलिंग वास्तूत असणं शुभ मानलं गेलं आहे. अक्षय्य तृतीयेला पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधीवत पूजा करा. त्यामुळे भगवान शिवांची कृपा राहते आणि वास्तुदोष दूर होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)