Akshaya Tritiya 2025 : सोन्याचे दर गगनाला, खरेदी करा ‘या’ गोष्टी, लक्ष्मी देवी राहील प्रसन्न
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसल्यास निराश होण्याचे कारण नाही. हे सर्व वस्तू घरात ठेवल्याने समृद्धी येते. अक्षय तृतीया हा शुभ दिवस लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करून साजरा करावा.

गुढीपाडव्याप्रमाणे अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ तिथी मानली जाते. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. सध्या राज्यातील सोन्याचा दर ९० च्या पार पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं शक्य होत नाही. जर तुम्हालाही अक्षय्य तृतीयेदिवशी सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर अजिबात निराश होऊ नका. कारण ज्योतिषशास्त्रात यावर काही सोपे उपाय देण्यात आले आहेत. ज्या वस्तू खरेदी करुन तुमच्यावर लक्ष्मी देवीची सदैव कृपा राहू शकते.
यंदा 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या दिवशी सोने, चांदी, जमीन किंवा वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. सोनं हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. मात्र, ज्यांना ते खरेदी करणे शक्य नाही, ते खालील वस्तू खरेदी करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात.
चांदीचे नाणे
जर अक्षय्य तृतीयेदिवशी तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही चांदीचे नाणे खरेदी करु शकता. लक्ष्मीचे चित्र असलेले चांदीचे नाणे खरेदी करुन ते तुम्ही घराच्या तिजोरीत ठेवू शकता. ज्यामुळे तुमची भरभराट होईल.
तांब्याचे किंवा पितळेचे भांडे
ज्यांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शक्य नसते, त्यांनी तांब्याचे किंवा पितळेचे भांडे खरेदी करावे आणि घरात ठेवावे. हे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.
पिवळ्या रंगाची कौडी
पिवळ्या रंगाची कौडी ही हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानली जाते. जी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेत शुभ मानली जाते. ही कौडी समुद्रकिनाऱ्यांवर आढळले. याला लक्ष्मी कौडी असेही म्हणतात. ही पिवळी कौडी खरेदी करुन घराच्या तिजोरीत ठेवा.
पिवळी मोहरी
अक्षय्य तृतीयेदिवशी जर तुम्ही पिवळ्या रंगाची मोहरी खरेदी करा आणि घरात ठेवा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरी कधीही अन्नाची कमतरता होणार नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)