Amarnath Clave : अमरनाथ गुफेचे हे रहस्य प्रत्येकाला करतात आश्चर्य, असा आहे याचा इतिहास
अमरनाथ गुहेचा शोध बुट्टा मलिक नावाच्या मेंढपाळाने लावल्याचे मानले जाते. मेंढ्या चरायला निघालेला बुट्टा मलिक लांबवर पोचला असताना वाटेत त्याला एक साधू भेटला ज्याने त्याला...
मुंबई : तीर्थक्षेत्र म्हटल्या जाणाऱ्या अमरनाथ गुहेत (Amarnath Clave) जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन घेण्याचे प्रत्येक शिवभक्ताचे स्वप्न असते. या वर्षीची अमरनाथ यात्रा उद्या 1 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. सनातन धर्मात अमरनाथ गुहेचे विशेष महत्त्व आहे. येथील चमत्कार आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. दरवर्षी मोठ्या संख्येने महादेवाचे भक्त त्यांच्या दर्शनासाठी लांब आणि खडतर प्रवास करतात. अमरनाथ गुहेत दरवर्षी 10 ते 12 फूट उंचीचे बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. चला, आज श्रीनगरपासून 141 किलोमीटर अंतरावर, 3888 मीटर उंचीवर म्हणजेच 12756 फूट, अमरनाथ गुहा आणि या यात्रेशी संबंधित रंजक तथ्य जाणून घेऊया.
अमरनाथ गुहेशी संबंधित रहस्य
बर्फाचे एकमेव शिवलिंग
काश्मीरमध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, परंतु त्यामध्ये अमरनाथ धामचे वेगळे महत्त्व आहे. काशीतील शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा करणाऱ्याला दहापट फळ मिळते असे सांगितले जाते. पण अमरनाथ बाबांच्या दर्शनाने प्रयागच्या 100 पट आणि नैमिषारण्यच्या हजार पट गुणवत्तेचे प्रमाण मिळते. बर्फापासून बनवलेले हे शिवलिंग जगातील एकमेव शिवलिंग आहे, जे दरवर्षी त्याच ठिकाणी बनवले जाते.
अमरनाथ गुहा
धार्मिक ग्रंथात अशा गुहेचे वर्णन आहे जिथे भगवान शिवाने माता पार्वतीला अमरत्वाचे ज्ञान दिले होते. धर्मग्रंथातील गुहेच्या वर्णनाप्रमाणेच अमरनाथ गुंफाही असल्याचे मानले जाते.
चंद्राच्या आकारानुसार कमी जास्त होते उंची
इतकेच नाही तर बर्फाणी बाबाची उंची चंद्राच्या आकाराप्रमाणे कमी होत राहते. म्हणजेच पौर्णिमा असते तेव्हा शिवलिंग पूर्ण आकारात असते. दुसरीकडे, अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाचा आकार थोडा कमी होतो. अमरनाथ गुहेचा शोध बुट्टा मलिक नावाच्या मेंढपाळाने लावल्याचे मानले जाते. मेंढ्या चरायला निघालेला बुट्टा मलिक लांबवर पोचला असताना वाटेत त्याला एक साधू भेटला ज्याने त्याला कोळशाची पिशवी दिली. घरी गेल्यावर बट्टा मलिकने जेव्हा ती पिशवी पाहिली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले कारण कोळशाचे सोन्यामध्ये रूपांतर झाले होते. बुट्टा मलिक त्या साधूच्या शोधात निघाला तेव्हा त्याला अमरनाथ गुहा दिसली पण साधू तिथे नव्हता. तेव्हापासून हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)