Amarnath Yatra 2022 | या तारखेपासून अमरनाथ यात्रेची नोंदणी सुरू, कोणती कागदपत्रे आवश्यक,अर्ज करण्याची पद्धत काय? जाणून घ्या सर्वकाही सोप्या शब्दात

मागील दोन वर्षापासून बंद असणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) यंदा मान्यता देण्यात आली आहे. अमरनाथ (Amarnath Cave) यात्रेची नोंदणी सुरू झाली आहे.

Amarnath Yatra 2022 | या तारखेपासून अमरनाथ यात्रेची नोंदणी सुरू, कोणती कागदपत्रे आवश्यक,अर्ज करण्याची पद्धत काय? जाणून घ्या सर्वकाही सोप्या शब्दात
amarnath
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:02 PM

मुंबई :  मागील दोन वर्षापासून बंद असणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) यंदा मान्यता देण्यात आली आहे. अमरनाथ (Amarnath Cave) यात्रेची नोंदणी सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षाची प्रतिक्षा संपली असून अनेकजन आता यात्रेच्या तयारीला लागले आहेत. यासाठी बुकिंग सुरु झालं आहे. कोरोना महामारीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, 2022 मध्ये ही यात्रा पुन्हा सुरू झाला आहे. 2022 ची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमरनाथ गुहा सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. हे भारताच्या सर्वोच्च हिमालयात जम्मू काश्मिीर राज्यात आहे. जम्मूची राजधानी श्रीनगर पासून 3.888 मिटर उंचीवर आहे येथे हिवाळयात हिन्दू धर्माचे भगवान शंकराची बर्फाची पिंड तयार होते. या गुहेच्या चहूबाजुस उंच उंच डोंगर व टेकडया आहेत. गुफा जवळपास वर्षभर बर्फाने आच्छादीत असते जेव्हां शिवलींग आकार घ्यायला लागते, तेव्हा श्रध्दाळूंसाठी अमरनाथ मंदीराचे व्दार उघडे केले जाते. भारतातुनच नाही तर जगभरातील हिन्दू भावीक येथे दर्शनासाठी येतात, या स्थळाला शिवाचे एक पवित्र ज्योर्तिलिंग मानले जाते.

?️ पवित्र गुहेचा शोध – (Baba Barfani Gufa Amarnath temple)

मध्यकाळातील शतकात या गुहेचा शोध लागला असे म्हटले जाते. 15 व्या शतकात धर्मगुरूंनी अमरनाथ गुहेला एका मंदीराचे स्वरूप दिले. धार्मिक आख्यायिकेनुसार भृगु ऋषींनी क्रोधात काश्मीर मधील बर्फ वितळवुन त्यास जलमग्न केले होते. त्यानंतर कश्यप मूनींनी येथील नदयांमधील पाणी परत बर्फात रूपांतरीत केले आणि अमरनाथ गुहेचा शोध घेउन शिवलिंगाची पुजा केली. सामान्यांच्या मते येथे नैसर्गिक रित्या भोलेनाथ शिवशंकराच्या कृपा व ज्योर्तिलिंगाच्या प्रतापामुळे बर्फाचे शिवलिंग स्थापीत होते.

श्री अमरनाथजी बोर्डाचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून एकूण ४३ दिवस चालणार आहे. या प्रवासासाठी नोंदणी प्रक्रिया 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी नोंदणी करण्यासाठी भाविक अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल अॅप वापरू शकतात.

?️ अमरनाथ यात्रेच्या नोंदणीसाठी आवश्यक दस्ताऐवज-

  1. अर्ज पूर्णपणे भरलेला असावा.
  2. आरोग्य प्रमाणपत्र.
  3. चार पासपोर्ट आकाराचे फोटो
  4. नोंदणीसाठी पात्रता- अमरनाथ यात्रा 2022 साठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 13 ते 75 वर्षे दरम्यान असावे. यासोबतच जर एखादी महिला 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ गरोदर असेल तर ती या प्रवासात सहभागी होऊ शकत नाही.

?️ कसं कराल रजिस्ट्रेशन

  1. तुम्हालाही या वर्षी होणाऱ्या अमरनाथ यात्रेत सहभागी व्हायचे असेल, तर त्याच्या नोंदणीसाठी तुम्ही https://jksasb.nic.in/register.aspx वर क्लिक करू शकता.
  2. येथे तुमचे सर्व तपशील घेतले जातील. यासोबतच प्रवाशाचे नाव, पत्ता आणि वैद्यकीय माहिती घेतली जाणार आहे.
  3. यासोबतच तुम्हाला वर दिलेली कागदपत्रेही अपलोड करावी लागतील.

?️ ऑफलाईन रजिस्ट्रेशन कसं कराल

जम्मू आणि काश्मीर बँक, पीएनबी बँक, येस बँक आणि एसबीआय बँकेच्या देशभरातील 100 शाखांच्या 446 शाखांमध्येही यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.