Ganesh Visarjan 2022: गणपतीचे पाण्यात विसर्जन का करतात? काय आहे या मागचे कारण?

गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो.

Ganesh Visarjan 2022:  गणपतीचे पाण्यात विसर्जन का करतात? काय आहे या मागचे कारण?
गणेश विसर्जन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:50 AM

यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) निर्बंधमुक्त असल्याने धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. अखेर लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित (Ganpati Visarjan 2022) करण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणपती विसजनांच्या बाबतीतही असेच आहे. जाणून घेऊया या विधी मागची कारणे.

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे. महर्षी वेदव्यास यांनी सलग 10 दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा 10 दिवस तंतोतंत लिहिली. 10 दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा, त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला. त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी  त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य  झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते.

निसर्गाचे चक्र दर्शविणारा विधी

निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीचे एक चक्र आहे. ज्या गोष्टीची सुरवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो आणि ज्याचा शेवट होतो ते पुन्हा निर्माण होते. निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो. निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गतःच ती विलीन होते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.