Astro Tips: आर्थिक तंगीचा करत असाल सामना, तर ‘या’ उपायांनी मिळेल फायदा
आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी काही उपायांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या उपायाने आपण लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकतो.
मुंबई, आजच्या काळात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे आहे. तथापि, असे अनेक लोकं आहेत ज्यांना आपले जीवन सामान्य मार्गाने चालविण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करावे लागतात, तरीही त्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे मिळत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार (Astro tips For Money) पैशाशी संबंधित समस्या अनेक कारणांमुळे असू शकतात, पण तुम्हाला हवे असल्यास आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी काही उपायांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या उपायाने आपण लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकतो.
पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी काही उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. यापैकी एक उपाय मूग डाळ आणि मीठाने करता येतो. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तसेच प्रत्येक दुःखातून मुक्ती मिळते.
धनप्राप्तीसाठी करा हे उपाय
बुधवारी मातीची दोन भांडी घ्या. यानंतर एका हंडीत 1.25 किलो मूग आणि दुसऱ्या हंडीत 1.25 किलो मीठ भरा. या दोन्ही हातांना मातीचे झाकण लावावे आणि नंतर तोंडाला प्लास्टिक गुंडाळून घट्ट बांधावे यानंतर या दोन्ही हातांना घरातील अशा ठिकाणी ठेवावे, जेथे कोणाची नजर जाणार नाही. नंतर ते तीन महिन्यांनी सोडावे आणि उघडून वाहात्या पाण्यात विसर्जीत करावे. यानंतर, तीच प्रक्रिया पुन्हा करावी आणि नवीन डाळी आणि मीठ दोन्ही भांड्यांमध्ये पुन्हा घरात लपवून ठेवावे. असे केल्याने श्रीगणेशासह देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो.
पिंपळाच्या या उपायाने होईल प्रगती
पिंपळाच्या झाडाला शनिवारी आणि मंगळवारी दूध,पाणी आणि गूळ यांचे मिश्रण अर्पण करावे.याने ग्रह अनुकूल होतील आणि तुम्हाला पितरांचे आणि देवतांचेही आशीर्वाद प्राप्त होतील.तसेच ज्या कारणांमुळे तुम्हाला नशीबाची साथ लाभत नाही ती कारणेही दूर होऊन प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील.ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल तिच्या सर्व समस्या नाहीश्या होऊन शनी ग्रहाच्या वक्र दृष्टीपासूनही तीची सुटका होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)