स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात ‘ही’ वस्तू लपवा, घरात येईल पैसाचं पैसा…
salt vastu tips: मीठ केवळ अन्नातच उपयुक्त नाही तर त्याच्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात याला खूप महत्त्व मानले जाते. जर योग्य पद्धतीने वापरले तर ते तुमच्या आयुष्यात चमत्कार करू शकते. चला तर जाणून घेऊया मीठाचे काही वास्तू उपाय.

अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होतो. घरातील नकारात्मक उर्जेमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुमच्या करियरमध्ये देखील प्रगती होत नाही. तुमच्या बाबतीत देखील असे होत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करा. हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. या घरगुती उपायांमुळे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात. तुम्ही तुमच्या घरात वेगळे मिठाचे डबे ठेवले आहेत का? जर नसेल तर लवकरच त्याची व्यवस्था करा. आज आपण असे काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यामुळे . जर हा उपाय योग्य पद्धतीने आणि भक्तीने केला तर अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
वास्तूशास्त्रानुसार, मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा राहील आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी राहील. मीठाचा वापर तुमच्या घरातील किंवा जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासठी केली जाते. अनेक वर्षांपासून आपले आजी आणि आई आपली नजर काढण्यासाठी मीठाचा वापर करतात. चला तर जाणून घेऊया नकरात्मकता काढण्यासाठी मीठाचा वापर कसा करावा?
तुम्हाला फक्त तुमच्या घरातील मिठाच्या पेटीत लवंगा ठेवाव्या लागतील. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. जर घरातील मिठाची पेटी रिकामी राहिली तर घराचे आशीर्वाद संपतात आणि आर्थिक परिस्थिती बिघडू लागते. म्हणून, मिठाचा डबा कधीही रिकामा राहू नये हे महत्वाचे आहे. शनिवार आणि मंगळवारी जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा त्यात थोडे काळे मीठ नक्कीच घाला. जर तुमच्या कुंडलीत शनि किंवा मंगळ दोष असेल किंवा साडेसतीचा प्रभाव चालू असेल तर हा उपाय केल्याने दोषाचा प्रभाव कमी होईल. गुरुवार वगळता दररोज तुमच्या आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ घाला. हा उपाय तुम्ही 21 दिवस सतत करा. यामुळे जीवनातील समस्या दूर होतील आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल. गुरुवारी घर झाडू नका. इतर दिवशी, जेव्हा तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा पाण्यात थोडेसे खडे मीठ घाला. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल. जर तुम्हाला खूप मेहनत करूनही निकाल मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच वापरून पहा.
गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलात एक चमचा पांढरे मीठ मिसळून एका ग्लासमध्ये ठेवा. हा ग्लास लाल कापडाने झाकून तुमच्या खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. दर 15 दिवसांनी हे पाणी बदला आणि त्यात पुन्हा एक चमचा मीठ घाला. असे केल्याने, जर तुमच्यावर काही दोष किंवा नकारात्मक परिणाम असेल तर तो दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू लागेल. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि पैशाच्या आवकासाठी नवीन मार्ग खुले होतील.