Astro Tips : पिंपळाच्या झाडाखाली का लावला जातो दिवा? धार्मिक कारण आणि नियम

पिंपळाच्या झाडाखाली दिवा केव्हा लावू नये ? रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावू नये, एवढेच नाही तर सकाळी 10 नंतरही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू नये, कारण त्यानंतरचा काळ हा अशुभ मानला जातो. पिंपळाच्या झाडामध्ये श्रीकृष्णाचा वास असतो, असे म्हटले जाते, म्हणून या वृक्षाची खऱ्या मनाने पूजा करून श्रीकृष्ण आपल्या भक्तांवर अपार आशीर्वाद देतात.

Astro Tips : पिंपळाच्या झाडाखाली का लावला जातो दिवा? धार्मिक कारण आणि नियम
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे नियम
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:32 PM

मुंबई : पूजेच्या वेळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तुळशी, पिंपळ, वडाच्या झाडाखालीही दिवे (Diya Upay) लावले जातात. धार्मिक मान्यतेनुसार अशी काही झाडे आहेत ज्यात देव वास करतात आणि या झाडांजवळ दिवा लावून मनापासून इच्छा केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असल्यास त्यासाठी योग्य पद्धत आणि वेळ काय आहे ते आपण जाणून घेऊया.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा केव्हा लावावा

जर तुम्हाला सकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असेल तर सकाळी 7.00 ते 10:00 च्या दरम्यान दिवा लावावा. हे शुभ मानले जाते आणि असे म्हटले जाते की सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यास आणि त्याजवळ दिवा ठेवल्यास लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

संध्याकाळी दिवा केव्हा लावावा?  आता प्रश्न येतो की संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असेल तर त्यासाठी योग्य वेळ कोणती?  ज्योतिषांच्या मते, तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ फक्त संध्याकाळी 5:00 ते 7:00 वाजेपर्यंत दिवा लावू शकता, कारण संध्याकाळी 7:00 नंतर झाडे झोपतात आणि त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा

पिंपळाच्या झाडाखाली दिवा केव्हा लावू नये ? रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावू नये, एवढेच नाही तर सकाळी 10 नंतरही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू नये, कारण त्यानंतरचा काळ हा अशुभ मानला जातो. पिंपळाच्या झाडामध्ये श्रीकृष्णाचा वास असतो, असे म्हटले जाते, म्हणून या वृक्षाची खऱ्या मनाने पूजा करून श्रीकृष्ण आपल्या भक्तांवर अपार आशीर्वाद देतात.

हे नियम अवश्य पाळा

तुम्ही दररोज पिंपळाजवळ दिवा लावू शकता याशिवाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे विशेष फलदायी मानले जाते, तसेच ते खूप शुभ मानले जाते. एवढेच नाही तर पिंपळाच्या झाडाखाली नेहमी मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा, यामुळे देवाची कृपा भक्तावर कायम राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.