Astrology : उद्यापासून सहा महिने या तीन राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जीवनात होणार मोठी उलथापालथ

शनिची प्रतिगामी अवस्था सर्व राशींसाठी प्रतिकूल मानली जाते. शनिच्या बरोबरीने राहू आणि केतूचीही उलटी चाल सुरू होईल. शनि रात्री 10.56 वाजता मागे सरकणार आहे.

Astrology : उद्यापासून सहा महिने या तीन राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जीवनात होणार मोठी उलथापालथ
राशी परिवर्तन
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 6:40 PM

मुंबई : 17 जून, शनिवारी म्हणजेच उद्या शनिदेव (Shanidev) कुंभ राशीत प्रतिगामी होणार आहेत. शनिची प्रतिगामी अवस्था सर्व राशींसाठी प्रतिकूल मानली जाते. शनिच्या बरोबरीने राहू आणि केतूचीही उलटी चाल सुरू होईल. शनि रात्री 10.56 वाजता मागे सरकणार आहे. यासोबतच मेष राशीतील राहू आणि तूळ राशीतील केतू उलट दिशेने फिरणार आहेत. या अवस्थेत शनी, राहू आणि केतू जवळपास 6 महिने राहतील. शनी, राहू आणि केतूच्या या उलटसुलट हालचालींपासून कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

या राशीच्या लोकांना पुढचे सहा महिने राहावे लागेल सावध

1. कर्क

पुढील 6 महिने कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, त्यामुळे शहाणपणाने खर्च करा. नोकरदारांनी उद्धटपणापासून सावध राहावे, अन्यथा नोकरी जाऊ शकते. ऑफिसमध्ये कामाचा अधिक दबाव वाढू शकतो, त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते. कुटुंबाशी संबंधात अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

2. सिंह

सिंह राशीच्या लोकांना पुढील 6 महिने शनि, राहू आणि केतू यांच्या प्रतिगामी गतीबाबत काळजी घ्यावी लागेल. कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. जे लोकं नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला नाही, त्यामुळे विचारपूर्वक विचार करूनच कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करा. या प्रतिगामी स्थितीमुळे कामाचा ताण जास्त राहील, त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

3. वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना शनि, राहू आणि केतूची प्रतिगामी गती त्रास देऊ शकते. या प्रतिगामी टप्प्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान तुम्हाला अनावश्यक बोलण्यापासून दूर राहावे लागेल, अन्यथा तुमचे नाव कलंकित होऊ शकते. आर्थिक क्षेत्रात तुमचा खर्च खूप वाढू शकतो. तथापि, तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.