Vastu Tips : दिव्याचे हे सोपे उपाय बनवतील तुम्हाला लखपती,घरात कधीच भासणार नाही पैशांची कमी
हिंदू धर्मात देवी-देवातांची पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो, देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं.
हिंदू धर्मात देवी-देवातांची पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो, देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेते. ज्योतिष शास्त्रानुसार घरात दररोज दिवा लावला गेला पाहिजे. पूजा करताना देवासमोर दिवा लावावाच मात्र पुराणात दिव्याचे इतर देखील काही उपाय सांगितले आहे, ज्यामुळे घरात सुख- शांती नांदते. पैशांच्या समस्या दूर होतात. एखादं काम अडलं असेल तर ते पूर्ण होतं. दिव्यांच्या या उपायांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
शनि देवाच्या त्रासापासून मुक्ती
कुंडलीत असलेला राहु- केतूचा दोष दूर करण्यासाठी सकाळी पूजा करताना आणि सायंकाळी दिवा लावावा. यामुळे राहु-केतूच्या दोषापासून मुक्ती मिळते. तसेच दर शनिवारी शनि देवाच्या मंदिरात जर दिवा लावला तर शनिची साडेसाती नष्ट होते, तुमच्यावर सदैव शनि महाराजांची कृपा राहते.
मान-सन्मानाच्या प्राप्तीसाठी
जर तुम्हाला समाजात तुमचा मान वाढवायचा असेल, सन्मान प्राप्त करायचा असेल तर दररोज सकाळी सूर्य देवाला अर्ध्य द्या, आणि शुद्ध तुपाच्या दिव्यानं सूर्य देवाची आरती करा. याने समाजात तुम्हाला मान -सन्मान मिळेल सोबतच जर तुमचं एखादं मोठं काम अडलं असेल तर ते देखील सूर्य देव मार्गी लावतील.
घराची भरभराट होण्यासाठी
आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी भगवान विष्णू समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा, यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल. लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहील.सोबतच तुम्ही प्रत्येक गुरूवारी दिवसातून एकदा 108 वेळेस ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नम: या मत्रांचा जप देखील करावा.
पैशांच्या प्राप्तीसाठी
जर तुम्हाला पैशांच्या प्राप्तीमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर माता लक्ष्मी समोर सात मुखी दीपक लावावा, या दिव्यामध्ये केवळ शुद्ध तूपच वापरावे. लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी. यामुळे लक्ष्मी प्राप्त होऊन तुमच्या सर्व अडचणी, समस्या दूर होतात.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)