ममताला महामंडलेश्वर बनविल्याने बाबा रामदेव संतापले, म्हणाले की कोणालाही मुंडी पकडून…
ममता कुलकर्णी हीने सर्व संसार आणि मोहमाया त्याग करीत संन्यासी जीवन पत्करले आहे. महाकुंभ मेळाव्यात ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनली आहे, यावरुन अनेक साधूसंतांनी टीका टिपण्णी केली आहे. बाबा रामदेव यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

एकेकाळची बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रचंड चर्चेत आहे. ममता आता संसारातील सर्व मोहमाया त्याग करुन महामंडलेश्वर बनली आहे. ममता हीने २४ वर्षांनंतर भारतात परतली आणि अचानक महाकुंभ येथे पोहचली. त्यानंतर तिने अचानक किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. तिच्या या निर्णयानंतर अनेक जणांनी तिच्यावर टीका केली आहे. अनेक जणांना हा फिल्मी स्टंट वाटत आहे. एका दिवसात कोणी संत कसे काय बनू शकते असा सवाल केला जात आहे. यावरुन आता योगगुरु बाबा रामदेव देखील संतापले आहेत. रामदेव बाबांनी म्हटलेय की एका दिवसाने कोणी साधूसंत बनू शकत नाही..
महाकुंभ २०२५ मध्ये रिल्सच्या नावाने अश्लिलतेचा प्रसार केला जात आहे. त्यावरुन बाबा रामदेव संतापले आहेत. मीडियाशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की काही महामंडलेश्वर बनले आहेत.कोणाच्याही नावापुढे बाबा जोडणे, कोणत्याही पद्धतीचा बीभस्त व्हिडीओ, महाकुंभच्या नावाने पसरवला जाणे योग्य नाही. खरी कुंभ तो आहे जो मनुष्यत मधून देवत्व, ऋषित्व, ब्रह्मत्वामध्ये आऱोहरण होतो. स्नान वरुन ध्यान, ध्यान वरुन योग, योग साधना वरुन सत्य,प्रेम करुणा ते ध्यान योग, भक्तीयोग, कर्म योग, ही योगाची त्रिवेणी आहे.एक असते सनातनला जाणणे, सनातनला जगणे, सनातनला वाढविणे.परंतू सनातनच्या नावाने काही कमी दर्जाचे शब्द बोलणे सनातन नाही. सनातन हे शाश्वत सत्य आहे दे कधीच खोटे ठरू शकत नाही असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.




साधुत्व मिळविण्यासाठी पन्नास वर्षे खर्ची
यावेळी ममता कुलकर्णी हीला महामंडलेश्वर पदवी देण्याच्या बद्दल विचारले असता ते म्हणाले की एका दिवसात कोणी संत बनू शकत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षांची तपर्श्या लागते. आज तुमच्या समोर स्वामी रामदेव उभा आहे.आम्हाला हे साधुत्व मिळविण्यासाठी पन्नास वर्षे खर्ची पडली. यास संतत्व म्हणतात. साधु होणे ही मोठी गोष्ट आहे. महामंडलेश्वर खूप मोठे तत्व आहे. आजकल मी पाहत आहे की कोणालाही मुंडी पकडून महामंडलेश्वर बनविले जात आहे. असे होणे योग्य नाव्हते.