350 वर्ष जुन्या शिवलींगाला जात आहेत तडे, धक्कादायक कारण आले समोर

आयआयटी, बॉम्बेचा अहवाल समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनासह तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आणि आजूबाजूच्या वस्तू विक्रेत्यांची चौकशी केली.

350 वर्ष जुन्या शिवलींगाला जात आहेत तडे, धक्कादायक कारण आले समोर
बाबुलनाथ मंदिर Image Credit source: Social media
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 8:30 AM

मुंबई :  मुंबईचे बाबुल नाथ मंदिर (Babulnath temple Mumbai) हे स्थानिक भाविकांचे सर्वात महत्त्वाचे श्रद्धास्थळ आहे. लोकांच्या मनात या मंदिराबद्दल प्रचंड आस्था आहे. भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातून भाविक येथे येतात. शतकांपूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना झाली. मात्र काही दिवसांपासून या मंदिराच्या शिवलिंगाला भेगा पडताना दिसत आहेत. हे पाहता मंदिर प्रशासनाकडून शिवलिंगाला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी आयआयटी-बॉम्बे येथील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. हे शिवलिंग सुमारे 350 वर्षे जुने आहे. शिवलिंगावरील तडे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दूध, राख, गुलाल आणि इतर प्रकारच्या प्रसादावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिवलिंगावरील अभिषेकासाठी फक्त पाणीच टाकण्याची परवानगी आहे. शिवलिंगावर भेगा का दिसत आहेत हे जाणून घेण्यासाठी मंदिर प्रशासनाने आयआयटी-बॉम्बेशी संपर्क साधला.

शिवलींगाला भेगा पडण्यामागे काय आहे कारण?

आयआयटीच्या तज्ज्ञांनी बॉम्बेने या जागेची पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केला. भेसळयुक्त पदार्थांच्या सततच्या प्रभावामुळे शिवलिंगाची हानी होत असल्याकडे हा अहवाल बोट दाखवत आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण अहवाल येणे अपेक्षित आहे.

आयआयटी, बॉम्बेचा अहवाल समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनासह तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आणि आजूबाजूच्या वस्तू विक्रेत्यांची चौकशी केली. यादरम्यान मंदिराच्या आजूबाजूला भेसळयुक्त दूध व वस्तूंची सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, या भेसळयुक्त दुधाने शिवलिंगाला सतत अभिषेक केला जात होता. त्यामुळे मंदिर प्रशासनाने दूध आणि इतर गोष्टींच्या अभिषेकावर बंदी घातली आहे. भक्तांना शिवलिंगावर फक्त पाण्याने अभिषेक करण्याची परवानगी आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.