मुंबई : झोपल्यानंतर स्वप्न पडणे हे सामान्य आहे. स्वप्न बरंच काही सांगून जातात आणि याच्या माध्यमातून (Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck) तुम्ही येणाऱ्या काळातील स्थितीचा अंदाजा लावू शकतात. काही स्वप्न चांगली तर काही स्वप्न वाईट असतात. चला जाणून घेऊ स्वप्नात काय बघणे अपशकुन मानलं जातं (Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck)…..
स्वप्नात मांजर दिसणे अपशकुन मानलं जातं. स्वप्नात मांजर दिसणे हे दुर्दैव येण्याचे संकेत असू शकते. स्वप्नात मांजर दिसणे याचा आणखी एक अर्थ निघतो. तुमचा विश्वासघात होऊ शकतो असाही त्याचा अर्थ असतो.
एका खड्ड्यात अनेक स्वप्न दिसणे हे एक भयानक स्वप्न असतं. हे स्वप्न या गोष्टीचा पूर्वाभास असू शकतं की तुमच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनात कुठली समस्या उद्भवू शकते.
जर तुम्हाला स्वप्नात असं दिसत असेल की तुमचं नशिब तुमनच्या सोबत नसेल तर हे या गोष्टीचं संकेत असू शकतं की तुम्ही तुमच्या क्षमतांना कमी लेखत आहात. याचा अर्थ असा होतो की तुमचा स्वत:वर विश्वास नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार दर तुम्हाला स्वप्नात किटक दिसत असतील तर त्याचा अर्थ जीवनात येणारे उतार-चढाव असा होतो.
जर तुम्हाला स्वप्नात धुके किंवा धूर दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या जीवनात काही गोष्टी स्पष्ट पाहू शकत नाहीये किंवा काही लोकांनी समजू शकत नाहीये. तसेच, तुमच्या मनात कुठल्या प्रकारचा संशय असेल त्याचाही हा संशय असू शकतो.
जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही स्वत: रडताना दिसत असाल तर हे या गोष्टीचा संकेत असू शकतं की तुमच्या जीवनात कुठली कठीण परिस्थिती उद्भवू शकते.
जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही वरुन पडताना किंवा जखमी होताना पाहात असाल तर हे येणाऱ्या समस्यांचा संकेत असू शकतो.
स्वप्नात एखाद्या हयात नसलेल्या व्यक्तीला पाहणे ही देखील एक अशुभ संकेत असू शकतो.
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रे भुंकण्याचा आवाज येत असेल कर याचा अर्थ तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावं लागू शकते.
घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतातhttps://t.co/XRFpBepgxl#Shaligram
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 15, 2021
Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck
संबंधित बातम्या :
शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या…