Badrinath Dham : आज उघडले बद्रीनाथ मंदिराचे दार, मोक्ष मिळण्याबद्दल काय आहेत मान्यता?

भगवान बद्री विशालचे हे मंदिर देशातील प्रमुख विष्णू मंदिरांपैकी एक आहे, जिथे प्रत्येक हिंदूला त्याच्या आयुष्यात एकदा भेट देण्याची आणि पूजा करायची असते.

Badrinath Dham : आज उघडले बद्रीनाथ मंदिराचे दार, मोक्ष मिळण्याबद्दल काय आहेत मान्यता?
बद्रीनाथ मंदिरImage Credit source: Socila Media
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 12:48 PM

मुंबई : सनातन परंपरेशी संबंधित चार धामांपैकी एक असलेल्या भगवान बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath Dham) दार सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. भगवान बद्री विशालचे हे मंदिर देशातील प्रमुख विष्णू मंदिरांपैकी एक आहे, जिथे प्रत्येक हिंदूला त्याच्या आयुष्यात एकदा भेट देण्याची आणि पूजा करायची असते. त्यामुळेच मंदिराचे दरवाजे उघडताच या धामकडे भाविकांचा ओघ सुरू होतो. भगवान बद्रीनाथाच्या या मंदिराचे दरवाजे उघडणे, बंद करणे आणि पूजा पद्धतीची स्वतःची खास परंपरा आहे ज्यामुळे हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया बद्रीनाथ मंदिराशी संबंधित 7 मोठी रंजक रहस्ये.

बद्रीनाथ मंदिराचे रहस्य

  1. भगवान बद्रीनाथाचे मंदिर वर्षातून फक्त सहा महिने भक्तांच्या दर्शनासाठी उघडते आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे संपूर्ण सहा महिने बंद असते.
  2. बद्रीनाथ मंदिराच्या भगवान बद्री विशालसमोर एक दिवा लावला जातो जो कधीही विझत नाही. हे मंदिर सहा महिने बंद असतानाही नाही.
  3. दरवर्षी भगवान ब्रदीनाथांच्या मूर्तीला लेप लावण्यासाठी आणि सतत दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरले जाणारे तेल तेहरीच्या राजवाड्यातील विवाहित महिला काढतात. विशेष म्हणजे तेल काढण्याची संपूर्ण प्रक्रिया टिहरीच्या राणीच्या नेतृत्वाखाली होते.
  4. बद्रीनाथ धाममधील भगवान ब्रदी विशाल यांची ध्यानधारणा असलेली मूर्ती शालिग्राम खडकापासून बनलेली असल्याचे मानले जाते. जो एकदा बौद्धांनी नारदकुंडात टाकला होता. पण नंतरच्या काळात आदि शंकराचार्यांनी त्यांना त्यांच्या योगशक्तीने शोधून काढले. त्यानंतर विधीवत मंदिरात त्यांची पुनर्स्थापना केली. यासोबतच अखंड पूजा आणि रक्षणासाठी ज्योतिर्मठाची स्थापना करण्यात आली.
  5. दक्षिण भारतातील केरळमधील पुजारी बद्रीनाथ धाममध्ये भगवान श्री विष्णूची पूजा करण्यासाठी येतात. मंदिरात पूजा करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे. असे मानले जाते की शंकराचार्यांनी त्यांना मंदिरात भगवान बद्री विशालची पूजा करण्याचा अधिकार दिला होता.
  6. समुद्रसपाटीपासून 3000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर बसलेल्या भगवान बद्रीनाथांबद्दल असे मानले जाते की भविष्यात एक दिवस येईल, जेव्हा नर आणि नारायण पर्वत एकत्र येतील. त्यानंतर बद्रीनाथ धामकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होईल. यानंतर, भगवान विष्णूचे भक्त भविष्य बद्री नावाच्या तीर्थक्षेत्रात त्यांच्या देवतेचे दर्शन घेतील आणि त्यांची पूजा करतील.
  7. बद्रीनाथ मंदिरात जेथे नर-नारायण देवतेची पूजा केली जाते, त्या पवित्र तीर्थाविषयी अशी श्रद्धा आहे की येथे येणाऱ्या भाविकांना पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागत नाही. याचा अर्थ तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.