Bakri Eid 2022: बकरी ईदला कुर्बानी देताना चुकूनही करू नये ‘या’ पाच चुका; कुर्बानी संबंधित इस्लाम काय सांगतो?

आज देशभरात बकरी ईद (Bakri eid) सण साजरा केला जात आहे. बकरी ईद (Bakri eid 2022) म्हणजेच ईद-उल-अजहा हा इस्लाम धर्माचा दुसरा सर्वात महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीद हा सण बाराव्या महिन्याच्या 10 तारखेला साजरा केला जातो. बकरी ईद  हा सण रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी येतो. या दिवशी इस्लाम धर्माचे लोक मशिदीत जाऊन नमाज अदा […]

Bakri Eid 2022: बकरी ईदला कुर्बानी देताना चुकूनही करू नये 'या' पाच चुका; कुर्बानी संबंधित इस्लाम काय सांगतो?
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 10:26 AM

आज देशभरात बकरी ईद (Bakri eid) सण साजरा केला जात आहे. बकरी ईद (Bakri eid 2022) म्हणजेच ईद-उल-अजहा हा इस्लाम धर्माचा दुसरा सर्वात महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीद हा सण बाराव्या महिन्याच्या 10 तारखेला साजरा केला जातो. बकरी ईद  हा सण रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी येतो. या दिवशी इस्लाम धर्माचे लोक मशिदीत जाऊन नमाज अदा करतात आणि नंतर बकऱ्यांची कुर्बानी देतात. मात्र, बळी देताना अनेक जणांकडून जाणीवपुर्वक काही  चुका होतात. चला तुम्हाला त्याग संबंधित अशा 5 चुका जाणून घेऊया ज्या इस्लाममध्ये चुकीच्या मानल्या जातात.

बकरीदला या 5 चुका करू नये

  1.  ज्या प्राण्याचे बकरी ईदला कुर्बान केले जाते त्याचे वय एक वर्षापेक्षा कमी नसावे. दुर्बल, आजारी किंवा लंगड्या जनावराचा बळी देणे टाळावा. बळी दिल्या जाणाऱ्या प्राण्याचे डोळे, कान, पाय व वक्षस्थळे सुरक्षित असावीत.
  2. बकरी ईद निमित्ताने प्रत्येक मुस्लिम एका प्राण्याची कुर्बानी देतो. कुर्बानीत वापरलेली शस्त्रे जसे की चाकू किंवा कोयता   उघड्यावर ठेवू नका. सार्वजनिक ठिकाणी बळी देणे टाळा.
  3.  इस्लाममध्ये कुर्बानीसाठी ईद हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. कोणत्याही कारणाने ईदच्या दिवशी कुर्बानी देणे शक्य नसेल तर तीन दिवसांनी कुर्बानी देता येते.
  4. बकरी ईदला अर्पण केलेला बळी मांसाहाराच्या उद्देशाने करू नये. इस्लामनुसार बळी केवळ आणि केवळ प्रतिफळाच्या त्यागाच्या उद्देशाने दिला पाहिजे.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  कुर्बानी दिल्यानंतर मांस झाकून ठेवावे आणि त्याचे अवशेष खड्ड्यात पुरावे. नाल्यात रक्त आणि अवशेष टाकू नये. मांस तीन भागांमध्ये विभाजित करावे. पहिला वाटा नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांना द्या. दुसरा भाग गरीब आणि गरजूंमध्ये वाटून घ्या आणि तिसरा कुटुंबासाठी ठेवा.

बकरी ईदची सुरुवात कशी झाली?

इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. कुराणानुसार, एकदा अल्लाहने हजरत इब्राहिम यांची परीक्षा घेतली. त्याने हजरत इब्राहिम यांना आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहिम यांचे त्यांचा मुलगा हजरत इस्माईल याच्यावर खूप प्रेम होते आणि तो त्यांना त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय होते.

पण अल्लाहचा आदेश मिळाल्यानंतर हजरत इब्राहिम यांचा नाईलाज झालाआणि त्यांनी पुत्रप्रेमाऐवजी अल्लाहचा आदेश  निवडला. हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. हजरत इब्राहिम यांना वयाच्या 80 व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती, त्यामुळे त्यांच्या मुलाचा बळी देणे त्यांच्यासाठी खूप कठीण काम होते.

अल्लाहचे नाव घेत हजरत इब्राहिम यांनी डोळे बंद केले आणि मुलाच्या मानेवर चाकू ठेवला. पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की, त्याचा मुलगा त्याच्या शेजारी जिवंत उभा होता आणि त्याच्या जागी एक शेळीसदृश प्राणी चिरलेला होता. त्या दिवसापासून  कुर्बानी सुरू झाल्याचे सांगितले जाते. जेव्हा प्रेषित इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बानी देणार होते, तेव्हा अल्लाहने एक संदेशवाहक पाठवला आणि मुलाच्या जागी एक बकरी दिली अशी आख्यायिका आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.