Bakri Eid 2023 : नेमकी किती तारखेला साजरी होणार बकरी ईद? या दिवशी कुरबानी का दिली जाते?
यावेळी बकरीदच्या तारखेबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. कोणी 28 जून तर कोणी 29 जूनला हा सण साजरा करण्याबाबत चर्चा करत आहेत. भारतात हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल हे जाणून घेऊया.
मुंबई : ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद (Bakri Eid 2023) हा इस्लाम धर्माचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. इस्लाममध्ये या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. यावेळी बकरीदच्या तारखेबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. कोणी 28 जून तर कोणी 29 जूनला हा सण साजरा करण्याबाबत चर्चा करत आहेत. भारतात हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल हे जाणून घेऊया. इस्लामिक कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत आणि धूल हिज हा शेवटचा महिना आहे. या महिन्याच्या दहाव्या दिवशी ईद उल अजहा किंवा बकरी ईद हा सण साजरा केला जातो, जो रमजानचा महिना संपल्यानंतर 70 दिवसांनी येतो. इस्लामिक कॅलेंडरनुसार यंदा बकरी ईद सण किती तारखेला साजरा केला जाणार आहे ते जाणून घेऊया.
कुरबानी का दिली जाते?
मुस्लिम धर्माचे लोकं अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी कुरबानी देतात. मात्र इस्लाममध्ये हलाल पद्धतीने कमावलेल्या पैशातूनच कुरबानी स्विकारली जाते. यामध्ये बकरी किंवा मेंढीचा बळी दिला जातो. बळीच्या वेळी जनावराला दुखापत होऊ नये, आजारी पडू नये, याचे भान ठेवावे लागते.
अशी सुरू झाली प्रथा
इस्लाममध्ये बळीचे खूप महत्त्व आहे. कुराणानुसार असे नमुद आहे की एकदा अल्लाहला हजरत इब्राहिमची परीक्षा घ्यायची होती. त्याने हजरत इब्राहिमला आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहिम यांना त्यांचा मुलगा हजरत इस्माईल सर्वात जास्त प्रिय होता.
अल्लाहच्या आदेशानंतर हजरत इब्राहिम यांनी आपला मुलगा हजरत इस्माईलला ही गोष्ट सांगितली. हजरत इब्राहिम यांना वयाच्या 80 व्या वर्षी मूल झाले होते. त्यानंतर आपल्या मुलाचा बळी देणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते, पण हजरत इब्राहिम यांनी अल्लाहचा आदेश आणि पुत्रप्रेम या पैकी आपल्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला.
हजरत इब्राहिम यांनी अल्लाहचे नाव घेतले आणि मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला. पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की त्याचा मुलगा त्याच्या शेजारी जिवंत उभा होता आणि त्याच्या जागी एक शेळीसारखा प्राणी चिरलेला होता. त्यानंतर कुर्बानीची प्रथा सुरू झाली.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)