Basant Panchami 2024 : वसंत पंचमीला विद्यार्थ्यांनी करावी ही पाच कामं, शिक्षणात येणार नाही अडथळे
हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबर उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 रोजी ज्ञानाच्या देवीला समर्पित वसंत पंचमीचा (Bsant Panchami 2024) सण साजरा केला जाईल. या दिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबर उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. वसंत पंचमीच्या दिवशी शारदा देवीची पूजा केल्याने कला, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हणतात की या दिवशी देवी सरस्वतीचे दर्शन होते, म्हणून हा दिवस तिचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. शास्त्रानुसार, वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या काही उपायांमुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
वसंत पंचमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी करावे हे उपाय
ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी- जर तुमच्या मुलाला त्याच्या ध्येयाकडे एकाग्रतेने अभ्यास करता येत नसेल तर त्यासाठी माता सरस्वतीचे चित्र अभ्यासाच्या टेबलाजवळ ठेवा. असे केल्याने त्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीही सुधारते असे म्हटले जाते.
अशा प्रकारे करा सरस्वतीची पूजा – जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्याचे लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल, तर तुमच्या मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला लावा. मुलाच्या हाताने माता सरस्वतीला पिवळी फळे, फुले, पिवळा भगवा तांदूळ अर्पण करा. यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते.
या कामामुळे प्रगती होईल – ज्या मुलांना वर्गात बोलण्यात अडचण येते किंवा अभ्यास करूनही नीट लिहिता येत नाही, त्यांनी बसंत पंचमीच्या दिवशी चांदीचे पेन मधात बुडवून मुलाच्या जिभेवर ‘ओम’ लिहावे. असे मानले जाते की यामुळे बोलण्यात समस्या दूर होतात आणि मूल अभ्यासात पुढे राहते.
अभ्यासात अडथळे निर्माण होत असल्यास – ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत असतील त्यांनी वसंत पंचमीला माता सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण करावे आणि त्यानंतर ‘ओम ऊँ सरस्वत्याय ऊँ नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे मानले जाते की यामुळे अभ्यासात यश मिळते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी – बसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून गरजूंना वह्या आणि पेन दान करा. असे केल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, असे मानले जाते. मुलांचे मन अध्यात्माकडे वळवण्यासाठी सरस्वती मातेच्या चरणी वह्या व पेन अर्पण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)