Vasant Panchami 2022 | श्री कृष्णाला प्रिय असणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जप नक्की करा
हा सण वसंत पंचमी (vasant Panchami ) म्हणून ओळखला जातो . या दिवशी बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. असे असतानाच दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाला वसंत ऋतु देखील खूप प्रिय आहे.
मुंबई : माघ (Magh) महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला देवी सरस्वतीचा (Saraswati) प्रकतिदिन म्हणून साजरी केली जाते . हा सण वसंत पंचमी (vasant Panchami ) म्हणून ओळखला जातो . या दिवशी बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. असे असतानाच दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाला वसंत ऋतु देखील खूप प्रिय आहे. या ऋतूत निसर्ग आपल्या जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्या रुपात स्वतःला सजवतो. गीतेमध्ये वसंत ऋतुबद्दल भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, ‘मी सर्व ऋतूंचा वसंत आहे’ म्हणजेच त्यांनी वसंत ऋतुचे स्वतःचे रूप सांगितले आहे. 5 फेब्रुवारी, शनिवारपासून वसंत ऋतु सुरू होणार आहे. या ऋतूमध्ये तुम्ही श्रीकृष्णाच्या काही मंत्रांचा जप करून तुमचे सर्व त्रास दूर करू शकता.
वसंत पंचमीचे महत्त्व
- कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत.
- वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.
- वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा उत्पन्न दिवस मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.
- या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.
संकट दूर करण्यासाठी श्री कृष्ण या मंत्रांचा जप नक्की करा
– कृं कृष्णाय नम:
जर तुम्हाला जीवनातील सर्व संकटांनी घेरले असेल तर तुम्ही श्रीकृष्णाच्या या मंत्राचा नियमित १०८ वेळा जप करावा. या मंत्राने मोठ्या अडचणी देखील सहज दूर होतात. असे म्हटले जाते.
– ॐ श्रीं नम: श्री कृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा
या मंत्राला श्रीकृष्णाचा सप्तदशाक्षर महामंत्र आहे, असे म्हटले जाते की जर हा मंत्र सिद्ध झाला तर माणसाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
– हे कृष्ण द्वारकावासिन् क्वासि यादवनन्दन, आपद्भिः परिभूतां मां त्रायस्वाशु जनार्दन
जर तुम्ही अचानक जीवनात काही अडचणीत सापडलात आणि कोणताही मार्ग दिसत नसेल तर या मंत्राचा जप करा.
– ॐ देविकानन्दनाय विधमहे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण:प्रचोदयात
हा कृष्ण गायत्री मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने जीवनातील कोणत्याही प्रकारची दुःखे दूर होतात असे म्हटले जाते.
– आदौ देवकी देव गर्भजननं, गोपी गृहे वद्र्धनम्, माया पूतं जीव ताप हरणं गौवद्र्धनोधरणम्, कंसच्छेदनं कौरवादिहननं, कुंतीसुपाजालनम्, एतद् श्रीमद्भागवतम् पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण:दामोदरं वासुदेवं हरे, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे.
याला श्लोकी भागवत म्हणतात. असे मानले जाते की नियमित स्नानानंतर तुळशीच्या माळाने जप केल्यास मोठी समस्या दूर होते. त्याचा जप केल्याने श्रीमद भागवत पठणाचे पुण्य प्राप्त होते. माणसाची पापे दूर होतात आणि वाईट दिवस निघून जातात
मंत्रोच्चाराचे फायदे मंत्रोच्चार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
काही मंत्रांचा जप केल्याने जीभ, स्वर प्रणाली, ओठ, टाळू आणि शरीराच्या इतर जोड बिंदूंवर दबाव येतो. मंत्राचा जप केल्याने हायपोथालेमस नावाची ग्रंथी उत्तेजित होते. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे आणि काही आनंदी संप्रेरकांसह शरीराची अनेक कार्ये नियंत्रित करते. तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
मन शांत होण्यास मदत होते
मंत्रांची स्पंदन मनाला शांत करणारे हार्मोन्स उत्तेजित करण्यात मदत करतात. ते तुमच्या शरीराला विश्रांती देते. या गोष्टीमुळे तुम्हाला एकाग्र होण्यास मदत होते. केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते काही मंत्रांचा जप केल्याने जीभ, स्वर प्रणाली, ओठ, टाळू आणि शरीराच्या इतर जोड बिंदूंवर दबाव येतो. मंत्राचा जप केल्याने हायपोथालेमस नावाची ग्रंथी उत्तेजित होते. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे आणि काही आनंदी संप्रेरकांसह शरीराची अनेक कार्ये नियंत्रित करते. तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
vastu | घरात झाडं लावताय ? मग राशीनुसार रोपे लावा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील