विवाहित पुरुष नागा साधू बनू शकतात का? गृहस्थी जीवन जगणाऱ्यांसाठी काय आहे नियम?
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात नागा साधूंची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नागा साधू कोण असतात, ते कसे बनतात आणि त्यांचे जीवन कसे असते याची माहिती यात आहे. विवाहित लोकही नागा साधू बनू शकतात, पण त्यासाठी कठोर तपश्चर्या आणि संसारातील मोहाचा त्याग करावा लागतो.
महाकुंभचा आज दुसरा दिवस आहे. प्रयागराजच्या संगम तटावर जिथे तिथे नागा साधू दिसत आहेत. देशातील कानाकोपऱ्यातून नागा साधू या ठिकाणी स्नान करण्यासाठी आले आहेत. हजारो भाविकही प्रयागराजला आले आहेत. नागा साधू हे भाविकांमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. हे भाविक नागा साधूंचं दर्शन घेत आहेत. त्यांच्याकडून ज्ञान घेण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण नागा साधूंना लोक एवढं का मानतात? आपलं ऐशोआरामी आयुष्य सोडून लोक नागा साधू का बनतात? असे प्रश्न आहेतच. पण नागा साधू कोण बनू शकतात? विवाहित लोक नागा साधू बनू शकतात का? नागा साधू बनण्याची काय प्रक्रिया आहे, याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.
नागा साधू कोण बनू शकतात? हा लोकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे. विवाहित लोक नागा साधू बनू शकतात का? असा सवाल केला जातो. त्याचं उत्तर होय असं आहे. विवाहित लोक नागा साधू बनू शकतात. पण नागा साधू होणं सोप्पं नाहीये. त्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या, मेहनत करावी लागते. नागा साधू बनण्यासाठी संसारातील मोह माया सोडावी लागते. संपूर्ण आयुष्य देवाच्या चरणी घालवावं लागतं.
साधू बनण्याची प्रक्रिया
नागा साधू बनण्यासाठी कठिण तपश्चर्या करावी लागते. 6 ते 12 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. नागा साधू होण्यासाठी आपण योग्य आहोत आणि आपण ईश्वराप्रती समर्पित आहोत, हा विश्वास आपल्या गुरुला द्यावा लागतो. आपले सर्व नातेगोते सोडून देवाच्या प्रति समर्पित व्हावं लागतं. नागा साधू बनण्यासाठी आखाड्यात प्रवेश केल्यानतंर ब्रह्मचर्याची परीक्षा घेतली जाते.
नागाचा खरा अर्थ काय?
काही विद्वानांच्या मते नागा हा शब्द संस्कृतमधून आला आहे. याचा अर्थ डोंगर असा होतो. नागा साधूंचा मुख्य उद्देश धर्माची रक्षा करणंम आहे. शास्त्राच्या ज्ञानात निपूण होणं आहे. ते आखाड्याशी जोडले जातात. ते आखाड्याशी जोडले जातात आणि समाजाची सेवा करतानाच धर्माचा प्रचारही करतात. कठोर तपश्चर्या आणि शारीरिक शक्तीसाठी हे नागा साधू ओळखले जातात. नागा साधू आपल्या शरीरावल हवनातील विभूती लावतात. नागा साधू धर्म आणि समाजासाठी काम करतात.
भस्म कसे बनते?
नागा साधू जे भस्म शरीरावर लावतात ते दीर्घ प्रक्रियेनंतर तयार होते. हवन कुंडात पिंपळ, पाखड, रसाळा, बेलपत्र, केळी आणि गोवऱ्या जाळल्या जातात. त्यानंतर त्यापासून भस्म तयार होते.