Wedding Muhurtas 2025 : औंदा लगीन करायचंय? मग 2025 चे शुभ मुहूर्त जाणून घ्या

2025 हे वर्ष हिंदू धर्मातील लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्तांनी समृद्ध आहे. या लेखात 2025 मध्ये उपलब्ध असलेल्या 74 शुभ मुहूर्तांची माहिती महिन्यानुसार दिली आहे. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये लग्नासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत हे लक्षात ठेवावे. वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा लेख उपयुक्त ठरेल.

Wedding Muhurtas 2025 : औंदा लगीन करायचंय? मग 2025 चे शुभ मुहूर्त जाणून घ्या
wedding dates 2025 vivah muhuratImage Credit source: tv9 bharatvarsh
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 12:02 AM

जुन्या वर्षाला निरोप देऊन आपण नव्या वर्षात प्रवेश केला आहे. नव्या आशा, आकांक्षा घेऊन आपण 2025मध्ये प्रवेश केला आहे. अनेकांना अनेक महत्त्वाची कामे यंदा करायचं आहे. कुणाला ऑफिसची कामे उरकायची आहेत, कुणाला कर्जाचं नियोजन करायचं आहे, कुणाला घर खरेदी करायचं आहे तर कुणाला गाडी खरेदी करायची आहे. पण देशात असाही एक मोठा वर्ग आहे, ज्याला औंदा लगीन करायचं आहे. बऱ्याच जणांची तर लगीन घाईही सुरू झाली आहे. पण इतकेही उतावीळ होऊ नका. आधी यंदाच्या वर्षात लग्नासाठीचे कोणते कोणते शुभ मुहूर्त आहेत ते चेक तर करा आणि मग वाजवा की धुमधडाक्यात लग्न.

आपल्या हिंदू धर्मात कोणतंही कार्य करताना शुभ काळ पाहिला जातो. कोणत्याही मंगलकार्याची सुरु करण्यासाठी शुभ मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा असतो. शास्त्रानुसार, जे 16 सण किंवा विधी सांगितले आहेत. त्यात लग्न सोहळा हा एक महत्त्वाचा विधी आहे. त्यामुळेच विवाह करताना शुभ मुहुर्त पाहिला जातो. वधू-वरांनी एकमेकांना आयुष्यभर साथ दिली पाहिजे, त्यांच्या विवाहात कोणतंही विघ्न येऊ नये, लग्नानंतर कोणत्याही अडचणी उद्भवू नये म्हणून शुभ मुहूर्त पाहूनच लग्न केलं जातं.

2025मधील शुभ मुहूर्त किती आणि कोणते?

यंदाच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये विवाहासाठी एकूण 74 शुभ मुहूर्त आहेत. हे मुहूर्त कोणत्याही व्यक्तीच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील विवाहाच्या दिवशी वापरले जाऊ शकतात. खाली दिलेल्या प्रत्येक महिन्याच्या शुभ विवाह मुहूर्तांची माहिती दिली आहे.

जानेवारी 2025

जानेवारी महिन्यात बरेच शुभ मुहूर्त आहेत. 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26 आणि 27 या तारखांना शुभ मुहूर्त आहेत.

फेब्रुवारी

फेब्रुवारीमध्ये 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23 आणि 25 तारीख शुभ आहे.

मार्च

मार्च महिन्यात 1,2, 6, 7, आणि 12 तारीख विवाहासाठी शुभ आहेत.

एप्रिल

एप्रिल महिन्यात 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29, आणि 30 तारीख विवाहासाठी शुभ आहेत. म्हणजे एप्रिल महिन्यात एकूण 9 शुभ मुहूर्त आहेत.

मे

मे महिन्यात 1, 5, 6, 8, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24 आणि 28 तारीख शुभ आहेत.

जून

जून महिन्यात 2, 4, 5, 7 आणि 8 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

नोव्हेंबर

2, 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 आणि 30 या नोव्हेंबर महिन्यातील तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

डिसेंबर

डिसेंबर महिन्यात फक्त 4, 5, आणि 6 या तीन तारखा विवाहासाठी शुभ आहेत.

कुठले महिने विवाहासाठी शुभ नाहीत?

2025 मध्ये, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर महिन्यांत विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत. कारण, जून महिन्यात भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेला जातात. त्यानंतर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.