Bhadli Navmi 2022: उद्या भादली नवमीला बनणार आहेत तीन शुभ योग, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला भादली नवमी (Bhadli Navmi 2022) म्हणतात. भादली नवमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशीही अक्षय्य तृतीयेप्रमाणे लग्न, मुंडण, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यांसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. ज्योतिषांच्या मते, जर लग्नासाठी मुहूर्त मिळत नसेल तर भादली नवमीच्या दिवशी कुठलाही मुहूर्त न पाहता लग्न करता येते. भादली नवमी 2022 तारीख आणि […]
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला भादली नवमी (Bhadli Navmi 2022) म्हणतात. भादली नवमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशीही अक्षय्य तृतीयेप्रमाणे लग्न, मुंडण, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यांसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. ज्योतिषांच्या मते, जर लग्नासाठी मुहूर्त मिळत नसेल तर भादली नवमीच्या दिवशी कुठलाही मुहूर्त न पाहता लग्न करता येते.
भादली नवमी 2022 तारीख आणि मुहूर्त-
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 7 जुलै रोजी सायंकाळी 7.28 मिनिटांनी सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी, 8 जुलै रोजी सायंकाळी 6.25 पर्यंत चालेल. उदय तिथींमुळे भादली नवमी शुक्रवार, 8 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
अतिशय शुभ योगाने साजरी होणार भादली नवमी-
हिंदू दिनदर्शिकेनुसार, भादली नवमीच्या दिवशी शिव, सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहेत. ज्योतिषांच्या मते या योगांमध्ये केलेल्या कामात यश मिळते. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे चांगले मानले जाते. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. 08 जुलै रोजी सकाळी 09:01 पर्यंत शिवयोग राहील. यानंतर सिद्धी योग सुरू होईल.
भादली नवमीला लग्नाचा मुहूर्त-
यंदा भादली नवमीला शुभ संयोग घडत आहेत. भादली नवमीच्या दिवशी शुभ कार्य संध्याकाळी 6.30 पर्यंतच करता येते. दोन दिवसांनी चातुर्मास सुरू होईल, त्यानंतर पुढील चार महिने शुभ कार्य करता येणार नाही.
भादली नवमी शुभ मुहूर्त 2022-
ब्रह्म मुहूर्त – 04:09 AM ते 04:49 AM. अभिजित मुहूर्त – सकाळी 11:58 ते दुपारी 12:54 पर्यंत. विजय मुहूर्त – दुपारी 02:45 ते दुपारी 03:40 पर्यंत. संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी 07:09 ते संध्याकाळी 07:33.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)